डिश कंपन्यांकडून ग्राहक वेठीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

पुणे - डिश कंपन्यांकडून सध्या टीव्हीच्या ग्राहकांचा मानसिक छळ सुरू असल्याचे समोर आले आहे.  

चॅनेल निवडीचे पॅकेज ऑनलाइन पाठविल्यानंतर आणि ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क केल्यानंतरही डिश कंपन्यांकडून ग्राहकांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे डिश कंपन्यांच्या मनमानीविरोधात तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्‍न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) टीव्ही ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहेत. या निर्णयाचे ग्राहकांकडून स्वागतदेखील होत आहे. डिश कंपन्यांनीसुद्धा आपले पॅकेज ग्राहकांसमोर सादर केले आहेत. त्यापैकी कोणतेही एक पॅकेज निवडून संबंधित डिश टीव्ही कंपनीला ऑनलाइन कळवायचे आहे. तसेच काही अडचण असल्यास या कंपन्यांकडून ई-मेलदेखील देण्यात आला आहे. त्यानुसार ग्राहकांनी पसंतीच्या चॅनेलचे पॅकेज तयार करून कंपन्यांना कळविले आहे. तसेच, ई-मेलच्या माध्यमातूनदेखील कंपनीशी संपर्क साधला आहे. परंतु अनेक ग्राहकांना कंपनीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांकडून ग्राहक सेवा केंद्रांचे दिलेले नंबरदेखील उचलले जात नाही. त्यामुळे वैतागलेल्या या ग्राहकांना कोणाशी संपर्क साधावा, असा प्रश्‍न पडला आहे.

माझ्याकडे व्हिडिओकॉन कंपनीचे डिश आहे. त्यांना ई-मेल आणि ऑनलाइन फॉर्म भरून दिला आहे. परंतु, अद्याप टीव्ही सुरू झालेला नाही. त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता, तोदेखील कोणी उचलत नाही. ई-मेललासुद्धा अद्याप उत्तर मिळालेले नाही, त्यामुळे काय करावे हे समजत नाही.
- चंद्रकांत रायरीकर, कोथरूड, डिश टीव्ही ग्राहक

Web Title: Dish Company Customer Problem