वेल्हेतील भूमिपूजन कार्यक्रमातील कोनशिले वरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद | Dispute | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेल्हेतील भूमिपूजन कार्यक्रमातील कोनशिले वरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद
वेल्हेतील भूमिपूजन कार्यक्रमातील कोनशिले वरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद

वेल्हेतील भूमिपूजन कार्यक्रमातील कोनशिले वरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद

वेल्हे (पुणे) - वेल्हे तालुक्यात उद्या होत असलेल्या भूमिपूजन कार्यक्रम वरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वाद निर्माण झाला असून, लावण्यात आलेल्या कोनशीला प्रोटोकॉल तयार केली नसल्याचे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे. तर होणारा कार्यक्रम शासकीय नसून काँग्रेस पक्षाचा असल्याचे याठिकाणी प्रोटोकॉलचा विषयच येत नाही. असे वेल्हे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

वेल्हे काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन गुरुवार (ता. २५) रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होत आहे. वेल्हे व भोर तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्धाटन कार्यक्रमावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवाद सर्वश्रुत आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये वेल्हे ते केळद या मार्गावर मंजूर झालेल्या काही निधी हा खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या सीआरएफ फंडातून मंजूर झाला असून, कोनशिला ही प्रोटोकॉल नुसार केली नसून यावर खासदार सुप्रिया सुळे व पालकमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांचे नाव टाकले नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

अशा आशयाचे पत्र वेल्हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आल्याची माहिती आज सायंकाळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण राऊत यांनी दिली आहे. तर नियोजित कार्यक्रम हा शासकीय नसून तो काँग्रेस पक्षाचा असून, प्रोटोकॉलचा प्रश्नच निर्माण होत नसून, या विकास कामांसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित विकासकामे भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमांमध्ये सुद्धा आमदारांचे नाव जाणीवपूर्वक टाळले जाते. असे वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू (नाना)राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून वेल्हे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून अधिक पोलीस कुमक वेल्हे पोलिसांनी मागवून घेतली, आज हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कदम यांनी नियोजित कार्यक्रमा ठिकाणी भेट देऊन अनुचित प्रकार प्रकार घडू नये, म्हणून सूचना दिल्या असल्याची माहिती सह्ययक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.

loading image
go to top