उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे भोसलेंत खलबते 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी रात्री उदयनराजे व माजी आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्यात गोपनीय बैठकीत आगामी धोरणाबाबत खलबते झाली. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सातारा पालिका निवडणुकीत वितुष्ट आले. त्यातून शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या विरोधात आघाडी उघडली होती.

पुणे : खासदार उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी रात्री उदयनराजे व माजी आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्यात गोपनीय बैठकीत आगामी धोरणाबाबत खलबते झाली. उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात सातारा पालिका निवडणुकीत वितुष्ट आले. त्यातून शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या विरोधात आघाडी उघडली होती.

लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू नये, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. अखेरीस त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपची वाट धरली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही त्याच वाटेवर आहेत. त्यामुळे उदयनराजेंची राजकीय कोंडी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या घडामोडींना शह देण्यासाठी त्यांनी भाजपत जाण्याचा मार्ग शोधला आहे. त्यामुळे दोन्ही राजांना एकमेकांशी जुळवून घ्यावेच लागेल, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून दोघांचे एकमेकांविषयीचे बोलणे बदलले होते, तसेच दोघांमध्ये समझोत्याचे प्रयत्नही सुरू होते. त्याचाच पुढचा टप्पा आज पार पडला.

दोघांमध्ये आज राष्ट्रीय महामार्गावर एका ठिकाणी गोपनीय बैठक झाली. चर्चेचा पूर्ण तपशील समजला नाही. मात्र, आगामी निवडणुकीत मदत करण्यावर त्यांचे बोलणे झाल्याचे समजते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dispute between Udayan Raje - Shivendra Sinh Raje Bhosale