भाजप- महाविकास आघाडीत सोशल मीडियावर घुमशान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापल्याचे जाणवले.

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाच्या विरोधात महाविकास आघाडीचेही कार्यकर्ते जोमाने पुढे आले अन सुरू झाला तो जोरदार संघर्ष.... पण सोशल मीडियावर. मिम्स, मजकुराची डिझाईन असलेल्या पोस्ट, फोटो आदींद्वारे फेसबुक, ट्विटवर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापल्याचे जाणवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रदेश भाजपने शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा दरम्यान काळे कपडे घालून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा निषेध करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. या आंदोलनासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. परंतु, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही त्याला त्याच पद्धतीने प्रत्यूत्तर देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनीही प्रचारसाहित्याची जमवाजमव करीत सोशल मीडियावर जोरदार तयारी केली.
Image

Image

Image
भाजपचे आंदोलन सकाळी सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान पुण्यात होते तर, राज्याच्या विविध भागात सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान होते. त्यानुसार त्याच्या पोस्ट पडू लागल्या. परंतु, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पोस्टवर तिखट, नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस सुरू केला. त्यासाठी महाराष्ट्रद्रोहीभाजप असा ट्रेंड त्यांनी चालविला. ट्विटरवर तर हा ट्रेंड ट्रेंडींगमध्ये होता. भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, आशिष शेलार, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ, जगदिश मुळीक यांच्या पोस्ट पडल्यावर त्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले तर, आघाडीचे जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद् आव्हाड, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, चारूलता टोकस, वंदना चव्हाण आदींनीही भाजपच्या आंदोलनावर टीका करणाऱया पोस्ट व्हायरल केल्या.
--------
१९९९पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळावर एक नजर
--------
भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवण्याचं धाडस
--------
सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार
---------
भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीपासून महाराष्ट्र वाचवा, अशी घोषणा केली होती तर, महाराष्ट्रद्रोही भाजप, असे महाविकास आघाडीने त्यांना प्रत्यूत्तर दिले. तर, केंद्राने महाराष्ट्राला मदत केली नाही, देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी महाविकास आघाडीने सरकारने पुरेशी खबरदारी घेतली नाही, समृद्धी महामार्ग, पीएम केअर, राज्यपालांच्या जीवावर सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहणारे नेते, कोरोनाच्या योद्धांचा अपमान करणारे नेते, सरकारमधील लिडरशिप क्रायसीस,भोंगळ कारभार आदी अनेक मुद्दे या वॉरमध्ये वारंवार चर्चेला येताना दिसत होते अन त्यावर प्रतिक्रिया, उलट प्रतिक्रिया उमटून त्या व्हायरल होत होत्या... पक्षाला नावे ठेवताना काही नेटिझन्स नेत्यांना वैयक्तिकही दूषणे देत होती. त्या-त्या नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला सावरण्यासाठी शोधून उत्तरे देत होती अन त्यावर पुन्हा कॉमेंटस पडत होत्या. त्यामुळे लाईक, कॉमेंटस हा ट्रेंड सुरूच होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute in BJP and Mahavikas Aghadi on social media