मोबाईल लोकअदालतीद्वारे मिटणार वाद

मोबाईल लोकअदालतीद्वारे मिटणार वाद

पुणे -  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या फिरत्या लोक अदालतीद्वारे (मोबाईल लोक अदालत) आता जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन, तडजोडीने खटले मिटवले जाणार आहेत. काही ठिकाणी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल. 

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा न्यायालयात अदालतीचे उद्‌घाटन करण्यात आले. गावोगावी जाऊन न्याय देता यावा, यासाठी फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून ‘न्याय आपल्या दारी’ ही सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरविली जाते. २९ जूनपर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी ही अदालत व शिबिर होणार आहे. लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे विविध बॅंका, वित्तीय कंपन्या तसेच मोबाईल- दूरध्वनी कंपन्यांकडील दाखलपूर्व प्रकरणे, विविध शासकीय, निमशासकीय, पोलिस खात्याकडील दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. विविध कायद्यांवरील माहिती, मोफत कायदेविषयक साह्य व सल्ला योजना, समुपदेशनाद्वारे प्रकरणांमध्ये समझोता, तसेच गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना यांची माहिती तज्ज्ञांमार्फत नागरिकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली.

शिबिराचे ठिकाण व तारीख
इंदोरी (ता. ७), जुन्नर (ता. ११), घोडेगाव (ता. १३), कडाची वाडी (ता. १५), विठ्ठलवाडी (ता. १८), खडकी (ता. २०), डाळज नंबर १ (ता. २२), शिरवली (ता. २५), नारायणपूर (ता. २७), कुसगाव (ता. २९).

लोकअदालतीचे ठिकाण व तारीख
  कामशेत :    ६ जून
  जुन्नर :    १० जून
  घोडेगाव :    १२ जून
  पेठ :    १२ जून
  तळेगाव ढमढेरे :   १७ जून
  खडकी :    १९ जून
  बेलवडी :    २१ जून
  वानेवडी :    २४ जून
  सासवड :    २६ जून
  कुसगाव :    २८ जून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com