माळशेजचा पतंग महोत्सव अडकला वादाच्या भोवऱ्यात कारण....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

राज्याच्या पर्यटन विकास मंडळाने निसर्गरम्य माळशेज घाटात प्रथमच पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. राज्यस्तरीय महोत्सवात हजारो पतंगप्रेमी पर्यटक सहभागी झाले होते. शुक्रवारपासून (ता. 10) सुरू झालेल्या तीन दिवसांच्या उत्सवात पर्यावरणाला धोका पोचविणारा प्लॅस्टिकचा पतंग व नॉयलानच्या मांजाचा वापर झाल्याची बाब पुढे आली आहे

जुन्नर : निसर्गरम्य माळशेज घाटातील पहिल्याच पतंग महोत्सवाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, काही नवख्या व अतिउत्साही पर्यटकांनी प्लॅस्टिकचे पतंग आणि नॉयलानचा मांजा वापरल्याची चर्चा आहे, त्यामुळे हा पतंग महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 
Image may contain: one or more people, people standing, sky, outdoor and nature

une/pune-police-gave-wishes-makarsankrat-pune-citizen-252464" target="_blank">पुणे पोलिस म्हणतात, तिळगुळ घ्या; गोड बोला अन्, कडू बोलणाऱ्यांना...
 

राज्याच्या पर्यटन विकास मंडळाने निसर्गरम्य माळशेज घाटात प्रथमच पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. राज्यस्तरीय महोत्सवात हजारो पतंगप्रेमी पर्यटक सहभागी झाले होते. शुक्रवारपासून (ता. 10) सुरू झालेल्या तीन दिवसांच्या उत्सवात पर्यावरणाला धोका पोचविणारा प्लॅस्टिकचा पतंग व नॉयलानच्या मांजाचा वापर झाल्याची बाब पुढे आली आहे. हा वापर नगण्य प्रमाणात असल्याचा 
दावा पर्यटन मंडळ तसेच सहभागी स्वयंसेवी संस्थांकडून केला जात आहे. मात्र, संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा
 

ही बाब लक्षात आल्यानंतर जुन्नरमधील काही पर्यावरणप्रेमींनी येथे सोडून दिलेले तसेच तुटून दूर गेलेले पतंग व दोर खोल दरीत उतरून गोळा करण्याचे काम केले. त्यामुळे येथील निसर्गसंपदा तसेच पशुपक्षी यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. हा महोत्सव पर्यावरणपूरक होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले होते. पतंग, मांजा, इतर साहित्य तसेच अन्य स्टॉल येथे लावण्यात आले होते. धोकादायक अशा मांजामुळे पशुपक्षी तसेच मनुष्यप्राणीही गंभीर जखमी झाल्याची उदाहरणे आहेत. राज्य सरकारने अशा मांजाच्या वापरास बंदी घातली आहे. पतंग महोत्सवाचा आनंद लुटताना या बाबीकडे गांभीर्याने पाहणे, अशा पर्यटकांना त्यापासून परावृत्त करणे गरजेचे होते, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले. 

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय योजनेसाठी उचलले महत्त्वाचे पाऊल

स्थानिकांना रोजगाराच्या संधी 
नाशिक-पुणे-मुंबई या त्रिकोणात येणाऱ्या माळशेज घाटात पाचगणीनंतर पतंग महोत्सव आयोजित केल्याचा स्थानिक ग्रामस्थांना फायदा झाला. परिसरातील आदिवासी भागातील महिला बचत गटांच्या शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी होती. कडधान्ये, तांदूळ आदीची विक्री झाली. स्थानिक घाटात फिरण्यासाठी येत; परंतु पर्यटन विकास मंडळाच्या भागाकडे फिरकत नसत. यानिमित्ताने त्यांचा तेथील सहभाग वाढला. करंजाळे येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पेहराव करून पर्यटकांचे स्वागत केले, त्याचे कौतुक झाले. यापुढील काळात हा उपक्रम शंभर टक्के पर्यावरणपूरक होईल, यासाठी स्थानिक संस्था सक्रिय राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes in Malshej Kite Festival due to using Plastic Kite and Nylon Manja