कऱ्हेकाठी झाले 'आचार्य अत्रे पुरस्कारां'चे वितरण 

श्रीकृष्ण नेवसे
गुरुवार, 14 जून 2018

सासवड (पुणे) : आचार्य अत्रे यांच्या नावाचा त्यांच्या जन्मगावात कऱहेकाठी पुरस्कार आम्हाला मिळाला. त्यातून यापुढेही उर्वरीत आयुष्यात साहित्य निर्मिती होण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. ही शिदोरी भक्कम पाठबळ देईल, अशा शब्दात आचार्य अत्रे `साहित्य` पुरस्काराचे मानकरी व प्रसिद्ध लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी भावना व्यक्त केल्या.    

सासवड (पुणे) : आचार्य अत्रे यांच्या नावाचा त्यांच्या जन्मगावात कऱहेकाठी पुरस्कार आम्हाला मिळाला. त्यातून यापुढेही उर्वरीत आयुष्यात साहित्य निर्मिती होण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. ही शिदोरी भक्कम पाठबळ देईल, अशा शब्दात आचार्य अत्रे `साहित्य` पुरस्काराचे मानकरी व प्रसिद्ध लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी भावना व्यक्त केल्या.    

येथील आचार्य अत्रे यांच्या सासवड (ता. पुरंदर) या जन्मगावी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अत्रे पुरस्कार वितरण झाले. यावेळी लेखक प्रा. नलगे यांना आचार्य अत्रेंच्या नावाचा साहित्य पुरस्कार, विनोदी कलाकार वंदन राम नगरकर यांना कलाकार पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकार रमेश झंवर यांना पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. नलगे बोलत होते. यावेळी सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, तालुका पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परीषदेचे रावसाहेब पवार, ख्वाजाभाई बागवान, अॅड. प्रकाश खाडे, अॅड. कला फडतरे, डाॅ. राजेश दळवी, वसंत ताकवले, प्रविण भोंडे, महेश जगताप, डाॅ. भरत तांबे, एम. के. गायकवाड आदी मान्यवर व नागरीक उपस्थित होते. यंदाच्या 28 व्या वर्षातील पुरस्कारात प्रत्येकी रोख 11 हजार रुपये, मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, श्रीफळ आदींचा समावेश होता.

पत्रकार झवर म्हणाले, 1967 च्या दरम्यान मला अत्रेंच्या मार्गदर्शनाखाली दैनिक `मराठा`मध्ये काम करता आले. त्यांच्याकडून पत्रकारीतेतील बारकावे शिकता आले. साहित्य, नाटक व पत्रकारीतेत समर्थपणे अत्रेंनी मराठी भाषेचा मनासारखा व लक्षवेधी असा वापर केला. नगरकर म्हणाले., माझ्या वडीलांकडून (राम नगरकर) आलेली `एकपात्री`ची परंपरा मला एवढा मोठा पुरस्कार मिळवून देईल, असे वाटले नव्हते. कै. निळु फुलेंच्या प्रोत्सानामुळे मी एकपात्री कलाकार म्हणून उभा राहीलो. त्याला आज पावती मिळाली. यावेळी पाहुणे भोंडे यांनी सांगितले की, अत्रेंच्या आवडत्या सासवडच्या संगमेश्वरमंदिरालगत कऱहा नदी सुधारणेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

पालिका व शिवस्मृती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. म्हस्के म्हणाले, 28 वर्षे एखाद्या उपक्रमावर व त्याहून अधिक काळ साहित्य जणजागृतीवर सातत्या ठेवणे विजय कोलते यांनाच शक्य झाले. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. महेश जगताप यांनीही मनोगत मांडले. यावेळी प्रास्तविक पवार यांनी केले. पुरस्कारार्थींचा परिचय कोलते यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सचिन घनवट यांनी व आभार प्रदर्शन शांताराम पोमण यांनी केले.     

Web Title: distribution of acharya atre awards on karha river saswad