अपघातात पाय गमावलेल्या तरूणास कृत्रिम पायाचे वाटप

रमेश मोरे
शुक्रवार, 18 मे 2018

जुनी सांगवी (पुणे) : पिंपळे गुरव येथे जुनी सांगवी येथील प्रविण छबन जाधव (रा.जयमाला नगर) यास आ.लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कृत्रिम पायाचे मोफत वाटप करण्यात आले. आ.लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य आदीती निकम म्हणाल्या, आरोग्य महाशिबिरा दरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला होता. नजरचुकीने माहितीच्या अभावामुळे वंचित राहिलेल्या अपंगांना पेन्शन सुरू करणे व कृत्रिम हात पाय याचे वाटप करण्याचे काम समितीच्या वतीने सुरू आहे.जुनी सांगवी येथील प्रविण छबन जाधव यास एका अपघातात 2012 मधे उजवा पाय गमवावा लागला होता. 

आजवर व्हिलचेअर व कुबड्यांच्या साह्याने चालत होतो. कृत्रिम पाय मिळाल्याने व्हिलचेअर सुटणार असुन यामुळे चालण्यास मदत होईल.
- प्रविण जाधव, लाभार्थी

Web Title: distribution of artificial leg to accident victim in sangavi