सिलिंडर वितरण पूर्ववत करू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - घरगुती आणि व्यवसायिक गॅस सिलिंडरचे वितरण सुरळित करू, असे आश्‍वासन सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्याचे शहर अन्न व धान्य वितरण विभागाकडून सांगण्यात आले. घरगुती "गॅस सिलिंडरचा काळा बाजार' हे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध करताच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची गंभीर दखल घेत, आज (ता. 7) पेट्रोलियम कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये हे आश्‍वासन देण्यात आले आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणामध्ये विस्कळितपणा आल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, घरगुती आणि व्यवसायिक सिलिंडरचा काळा बाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी "सकाळ'कडे केल्या होत्या. या संदर्भात हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांच्या विक्री व्यवस्थापक आणि प्रादेशिक व्यवस्थापकांची संपर्क साधला असता त्यांनी आठवडाभरात वितरण व्यवस्था सुरळीत करू, तसेच काळ्या बाजारासंदर्भात शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करू, असे आश्‍वासन दिले होते. 

या बैठकीसंदर्भात शहर अन्न व धान्य वितरण अधिकारी शहाजी पवार म्हणाले, ""हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या वेळी घरगुती व व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या वितरणाचा आढावा घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून कच्च्या तेलाचा पुरवठा होऊ न शकल्याने वितरण व्यवस्थेत विस्कळितपणा आल्याचे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच उत्पादन विभाग पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. आगामी आठवडाभरात वितरण सेवा पूर्ववत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.'' 

Web Title: distribution cylinder