जुन्नरला 95 दिव्यागांना मोफत साहित्य वाटप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

"दिव्यागांच्या वेदनांची जाणीव ठेवून त्यांच्या विकासासाठी समाजाने भरीव योगदान देण्याची गरज आहे. सरकार व प्रशासन यांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या मानसिक समृद्धीचा प्रयत्न करण्याचे स्वयंसेवी संस्थेचे काम खरोखर कौतुकास्पद आहे" - तहसीलदार किरण काकडे 

जुन्नर - येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ता. 20 रोजी मार्तंड देवस्थान ट्रस्ट चिंचोली , समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ तळेगाव व महिंद्रा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 90 दिव्यांगाना मोफत कुबडीचे व पाच जणांना तीन चाकी सायकलीचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्याच्या विविध भागातील लाभार्थी उपस्थित होते.

तहसीलदार किरण काकडे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, अध्यक्ष भाऊसाहेब काशीद, राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ. उमाकांत वाबळे, आरोग्य अधिकारी डॉ. शाम बनकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, संतोष खांडगे, विनायक कडसकर आदी मान्यवर व लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

"दिव्यागांच्या वेदनांची जाणीव ठेवून त्यांच्या विकासासाठी समाजाने भरीव योगदान देण्याची गरज आहे. सरकार व प्रशासन यांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या मानसिक समृद्धीचा प्रयत्न करण्याचे स्वयंसेवी संस्थेचे काम खरोखर कौतुकास्पद आहे" - तहसीलदार किरण काकडे 

गटविकास अधिकारी सतीश गाढवे म्हणाले, ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर दिव्यांगासाठी तीन टक्के निधीची तरतूद करत त्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फकीर आत्तार यांनी केले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Distribution of free literature to 95 lanterns to Junnar