धामणीत विद्यार्थांना मोफत शालोपयोगीवस्तुंचे वाटप

सुदाम बिडकर
मंगळवार, 10 जुलै 2018

पारगाव (पुणे) - धामणी ता. आंबेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने धामणी गावातील पहिली ते बारावीतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांच्या हस्ते शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी तालुका गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन, वामन शिंदे, विस्तार अधिकारी रामदास  पालेकर, अॅड विठ्ठल जाधव पाटील, सरपंच सागर जाधव पाटील, माजी सरपंच अंकुश भुमकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितीन जाधव पाटील, गजाराम पाटिल जाधव, उपसरपंच वैशाली बोऱ्हाडे, प्रभाकर पंचरास, पांडुरंग ससाणे, ग्रामपंचायत सदस्य  दत्तात्रय गवंडी, मिलिंद शेळके, संगीता विधाटे, पुनम जाधव, भाऊसाहेब पंचरास, दिपक जाधव, शिवाजी विद्यालय प्राचार्य मेंगडे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांना दप्तर, वही, कंपास, पेन, आणि इतर वस्तू देण्यात आल्या. 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि आपली प्रगती करावी हा उद्देश ग्रामपंचायतीचा आहे म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सरपंच सागर जाधव यांनी सांगीतले. तर रविंद्र करंजखेले यांनी वर्षभरातील होणार्‍या शालेय उपक्रमांची माहिती ग्रामस्थांना दिली.

Web Title: Distribution of free school items to students