दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना वह्याचे वाटप

रमेश मोरे
मंगळवार, 10 जुलै 2018

जुनी सांगवी - प्रत्येकाने समाजाशी असलेली आपली नाळ कायम ठेऊन आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजातील उपेक्षित व गरजू व्यक्तींसाठी खर्च करावा. या उद्देशाने जुनी सांगवी येथील सातारा मित्र मंडळाने साता-यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. 

जुनी सांगवी - प्रत्येकाने समाजाशी असलेली आपली नाळ कायम ठेऊन आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजातील उपेक्षित व गरजू व्यक्तींसाठी खर्च करावा. या उद्देशाने जुनी सांगवी येथील सातारा मित्र मंडळाने साता-यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. 

समाजाला एकत्र करण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम आहे असे सातारा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी सकाळशी बोलताना सांगीतले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. मंडळाने सातारा जिल्ह्यतील दुष्काळग्रस्त असलेल्या माण, खटाव, सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवाशी असणाऱ्या आणी सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव पुणे येथे सध्या रहिवाशी असलेल्या लोकांनी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला.

खटाव तालुक्यातील श्री सेवागिरी विद्यालय, हनुमानगिरी विद्यालय, कन्या प्रशाला पुसेगाव. वेदावती हायस्कूल, जि .प .प्राथमिक शाळा खातगुण, महात्मा फुले हायस्कूल कटगुण, श्रीराम हायस्कूल ललगुण, गुरुवर्य गणपतराव काळंगे विद्यालय मोळ, माण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड, जि .प .प्राथमिक शाळा महिमानगड इत्यादि शाळांमधून ८५० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन प्रमाणे वह्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात टाटा मोटर्स टी .एम डी .सातारकर संजय काळे ग्रुप, कै .तुकाराम फौंडेशन पोलीस मित्र संघटना चिंचवड,सूर्यकांत बरसावडे व चंद्रकांत पवार ग्रुप, कोंढवा पोलीस ठाणे, हवालदार चंद्रकांत माने ग्रुप, बौध्द समिती पिंपरी, समाजभूषण रविंद्र कोकाटे ग्रुप, किर्लोस्कर ऑईल इंजिन खडकी ग्रूप व सातारा मित्र मंडळाचे, प्रकाश पाटील, संजय चव्हाण, महेश भागवत, सोमनाथ कोरे, सतीश जाधव, सचिव संभाजी मोरे, दिपक गोडसे,  विश्वास शिंदे, राजेंद्र कदम, वीरेंद्र गायकवाड, विजय यादव, नंदकुमार घोरपडे, प्रकाश घोरपडे. संजय जाधव, शिवाजी गायकवाड, बापू कोरे, केतन काटकर आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

Web Title: Distribution of notebooks to drought-hit farmers children