अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना रेशनवर साखर वितरण

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची साखर स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे.
sugar
sugarsakal
Summary

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची साखर स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे.

पुणे - शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंत्योदय योजनेतील (Antyodaya Scheme) कार्डधारकांसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांची साखर (Sugar) स्वस्त धान्य दुकानांमध्ये (Ration Shop) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील कार्डधारकांसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची साखर स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध झाली आहे. दर महिन्याला प्रतिकार्ड एक किलो यानुसार तीन किलो साखर देण्यात येणार आहे. या योजनेतील साखरेचा दर प्रतिकिलो २० रुपये आहे. शहर आणि जिल्ह्यात या साखरेचे वितरण सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी या तीन महिन्यांची साखर घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने आणि पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

  • पुणे, पिंपरी चिंचवडमधील अंत्योदय कार्डधारक : ८ हजार २५५

  • साखर वितरण : दरमहा सुमारे ८२ क्विंटल

  • जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारक : सुमारे ४९ हजार

  • साखर वितरण : दरमहा सुमारे ४९० क्विंटल

  • साखरेचा दर प्रतिकिलो : २० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com