भाईचारा...राम मंदिर भूमिपूजनानिमित्त मुस्लीम बांधवांकडून पेढ्यांचे वाटप 

रमेश वत्रे
Wednesday, 5 August 2020

अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या संकल्पपूर्तीबद्दल दौंड तालुक्यातील चौफुला येथे मुस्लिम व हिंदू बांधवांनी एकत्रितपणे राम व हनुमानाची पूजा करून पेढे वाटप केले. या वेळी परस्परांना अलिंगन देत शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

केडगाव (पुणे) : अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या संकल्पपूर्तीबद्दल दौंड तालुक्यातील चौफुला येथे मुस्लिम व हिंदू बांधवांनी एकत्रितपणे राम व हनुमानाची पूजा करून पेढे वाटप केले. या वेळी परस्परांना अलिंगन देत शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा

चौफुल्यात भाजपचे कार्यकर्ते संतोष भोसले यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपुजनानंतर ग्रामस्थांना पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली. अजितभाई पानसरे व महेबूब पठाण यांनी पूजन केले. या वेळी भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, पोपट काळे, आप्पा मदने, आसिफ शेख, दत्ता शितोळे, छगन चौधरी, ज्ञानदेव चौधरी, सुरेश पटेल आदी उपस्थित होते. 

पुण्यात रेल्वेे, विमान, रिक्षा, कॅबला परवानगी, पण पीएमपीला

केडगाव आणि चौफुला येथील राम मंदिरात विशेष पुजा पाठ करून लाडू व पेढे वाटण्यात आले. या संकल्प पूर्तीबद्दल मंदिरात पहाटेपासून राम रक्षा व हनुमान स्त्रोतांचे भक्तिमय वातावरणात पठन करण्यात आले. मंदिरावर भगवे ध्वज लावण्यात येऊन रांगोळ्या काढण्यात आल्या. या मंगल उत्सवाबद्दल मंदिरावर तोरण बांधण्यात आले. या वेळी मारूती गायकवाड, हनुमंत जगताप, समाधान दाणे, प्रज्ञेश राऊत, पुजा गायकवाड, लता गायकवाड, शिवाजी ताठे आदी उपस्थित होते.

यंदा डाळिंबाचा नाद करायचा नाय

केडगावातील स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच यांच्यावतीने डॅा. नीलेश लोणकर व शुभम लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली काल 200 भगव्या झेंड्यांचे ग्रामस्थांना वाटप केले. ग्रामस्थांनी हे झेंडे घरावर लावले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of sweets by MuslimDistribution of sweets by Muslim citizens of Daund taluka on the occasion of Ram Mandir Bhumi Pujanf Daund taluka on the occasion of Ram Mandir Bhumi Pujan