पुणे - मांजरीत बेरोजगार महिलांना पीठगिरण्यांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मांजरी (पुणे) : पालिकेचे पुरेसे पाणी मिळावे, ही मांजरीकरांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात काही प्रमाणात पाणी प्रश्र्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही मांजरी गावचा पाणी प्रश्र्न सोडविण्यासाठी पालिकेत पुढाकार घेऊ, असे अश्र्वासन पालिकेतील  विरोधीपक्ष नेते चेतन तुपे यांनी दिले.

येथील जिल्हा परिषद सदस्य यांच्या निधीतून परिसरातील बेरोजगार पंधरा महिलांना पीठ गिरण्या तर सतरा महिलांना शिलाई मशिनचे वाटप चेतन तपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, जिल्हापरिषद सदस्य दिलीप घुले, माजी सदस्य नंदकुमार घुले, 
शिवाजी खलसे, यशवंतचे माजी संचालक अंकुश घुले, माजी उपसरपंच सुधीर घुले, ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले, बालाजी अंकुशराव, नेहा बत्ताले, जयश्री खलसे, आशा आदमाने, रामभाऊ कुंजीर आदी यावेळी उपस्थित होते. 

दिलीप घुले म्हणाले, "गेल्या एक वर्षाच्या काळात जिल्हापरिषद गटासाठी सुमारे एेंशी लाख रूपयांचा निधी आपण आणला आहे. त्यातून रस्ते, स्ट्रीट लाईट, गटारे यांसह विविध कामे सुरू आहेत. पालिकेकडून गावासाठी पुरेसे पाणी मिळावे, यासाठी वारंवार प्रयत्न करीत आलो आहोत. संपूर्ण गावाला 
पालिकेने पाणी दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे.'' ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title: distribution of wheat mixe girani to unemployed women