शस्त्रे जमा करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

७० हजार लिटर दारू जप्त 
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यात ७० हजार लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या दारूची किंमत सुमारे सात लाख रुपये आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ३२ हजार लिटर, शिरूर मतदारसंघात १२ हजार लिटर, पुणे मतदारसंघात साडेनऊ हजार लिटर आणि बारामती मतदारसंघात सुमारे १२ हजार लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.

पुणे - निवडणुकीच्या कालावधीत अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात सुमारे साडेअकरा हजार शस्त्र परवानाधारक असून, त्यापैकी काहींना शस्त्र जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पुणे जिल्हा ग्रामीणच्या हद्दीत एकूण तीन हजार ८२५ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी तीन हजार ६६४ व्यक्‍तींना शस्त्र जमा करण्यास सांगितले होते. त्यापैकी तीन हजार ६५१ जणांनी त्यांचे शस्त्र पोलिसांकडे जमा केले आहेत. 

पुणे शहर पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील शस्त्र परवानाधारकांची संख्या सहा हजार ५४८ आहे. त्यापैकी ६०१ जणांना शस्त्र जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ५५५ जणांनी शस्त्र जमा केले आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील एक हजार ६० पैकी ८७३ जणांना शस्त्र जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्यापैकी ७२७ जणांनी त्यांचे शस्त्र पोलिस ठाण्यात जमा केल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: District Administrative Alert Weapon Loksabha Election Code of Conduct