जिल्हा बॅंकेकडून आता करीअर मेळाव्यांसाठीही निधी: डॉ. वर्षा शिवले

भरत पचंगे
सोमवार, 25 जून 2018

शिक्रापूर (पुणे): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गरजेची व्याख्या बदलली असून शिक्षणसुविधेबरोबरच आता त्यांना करीअर मार्गदर्शनही गरजेचा आहे. याबाबत जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून, आमचे नेते अजित पवार यांना सांगून करीअर मेळाव्यांसाठी जिल्हा बॅंकेकडून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले यांनी धामारी (ता. शिरूर) येथे दिली.

धामारी येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेसाठी बॅंकेच्या शैक्षणिक निधीतून 40 हजारांची मदत नुकतीच देण्यात आली. या मदतीचा धनादेश संस्थाध्यक्ष दत्तोबा भगत व सचिव सुनिल गायकवाड यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. या कामी धामारी विकास सोसायटीचे अध्यक्ष कैलास डफळ यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी शाळेच्या शैक्षणिक साहित्यासाठी उपलब्ध झाला. त्यानिमित्त ग्रामस्थांचे वतीने श्री. डफळ यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

याच कार्यक्रमाचे दरम्यान बोलताना संचालिका डॉ. शिवले यांनी वरील माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, पूर्वी शाळा संख्या व विद्यार्थ्यी संख्या मर्यादित होती त्याप्रमाणे विद्यार्थी-शाळांच्या गरजाही वेगळ्या होत्या. आता मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक करीअर संधी खुणावताहेत. त्यामुळे हाच खर्च करीअर मार्गदर्शन, विद्यार्थी विद्यावेतन अशा कारणांसाठी खर्च होण्याचा प्रस्ताव आपण आमचे नेते शरद पवार यांना दिला असून, त्यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. पर्यायाने या विषयाबाबत जिल्हा बॅंकेचे मार्गदर्शक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे पाठपूरावा करुन करीअर मेळावे संपूर्ण जिल्हाभर घेण्यासाठी लवकर जिल्हा बॅंक पुढाकार घेईल.

यावेळी शाळा मुख्याध्यापक व्ही. डी. बांदल तसेच ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: District Bank now offers funding for career meetings says dr Varsha Shiwale