...म्हणून चाकण परिसरातील विद्युत पुरवठा राहणार बंद; प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Power_Supply_Off
Power_Supply_Off

पुणे : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी चाकण येथील एअर लिक्वीड इंडिया होल्डींग या कंपनीला मेडीकल ऑक्सिजन उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे. या कंपनीला विद्युत जोडणीसाठी परिसरातील इतर कंपन्यांचा विद्युत पुरवठा ठराविक कालावधीकरीता बंद करण्यात येणार असल्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

एअर लिक्वीड इंडिया होल्डींग कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी 132 के.व्ही. चिंचवड- चाकण विद्युत वाहिनी, 220 के.व्ही. व्होक्सवॅगन ते 220 के.व्ही. चाकण उपकेंद्र ही वाहिनी आणि 220 के.व्ही. चाकण उपकेंद्रामधून निघणारे सर्व 22 के.व्ही. आणि 132 के. व्ही. वाहिनीचा पुरवठा 15 ऑगस्टला सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. आयनॉक्स एअर प्रॉडक्टस आणि टायोनिपॉन सॅनसो इंडिया चाकण यांच्या मेडीकल ऑक्सिजन उत्पादनावर या विद्युत पुरवठा बंद कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आयनॉक्स एअर प्रॉडक्टस आणि टायोनिपॉन सॅनसो इंडिया चाकण यांनी सध्या होत असलेला मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा 15 ऑगस्ट आणि त्यानंतरही  सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादिवशी ज्या रुग्णालयांना ते मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा करतात, त्यांच्याशी मागणीबाबत समन्वय ठेवून आवश्यक तो मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होणार नाही, याबाबत जबाबदारी संबंधित कंपन्यांची राहील.

एअर लिक्वीड इंडिया होल्डींग ही कंपनी इतर राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करते. त्यामुळे त्यांनी बंद कालावधीमध्ये मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्याकरीता आयनॉक्स एअर प्रॉडक्टस आणि टायोनिपॉन चाकण यांच्याशी समन्वय साधून मेडीकल ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी एअर लिक्वीड इंडिया होल्डिंग यांची राहील. पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांना मेडीकल ऑक्सिजनचा पुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत राहील, याची जबाबदारी आयनॉक्स एअर प्रॉडक्टस आणि टायोनिपॉन यांची राहील.

एअर लिक्वीड इंडिया होल्डींग कंपनीला विद्युत जोडणी करण्यासाठी दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com