जिल्हा परिषदेसाठी हवेलीत 63 उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

वाघोली/खडकवासला - हवेली तालुक्‍यातील 13 जिल्हा परिषद गटांसाठी 63; तर 26 पंचायत समिती गणांसाठी 126 उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश गटांत चौरंगी लढत होणार आहे. उरुळी देवाची-वडकी गटात सर्वाधिक सात उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांत कमी पेरणे-वाडेबोल्हाई गटात तीन उमेदवार रिंगणात आहेत. 

देहू-लोहगाव गटात सर्वाधिक 17 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 13 जणांनी माघार घेतल्याने या गटात चार उमेदवार रिंगणात आहेत. वाघोली-आव्हाळवाडी गटात सहा, पेरणे-वाडेबोल्हाई गटात तीन, उरुळी कांचन-सोरतापवाडी गटात चार, थेऊर-लोणी काळभोर गटात पाच, फुरसुंगी-कदमवाक वस्ती गटात चार, मांजरी-शेवाळवाडी गटात सहा, केशवनगर-साडेसतरानळी गटात सहा, उरुळी-देवाची गटात सात, आंबेगाव-नऱ्हे गटात चार, धायरी-नांदेड गटात पाच; तर मांगडेवाडी-डोणजे गटात पाच जण रिंगणात आहेत. 

गणांतही चौरंगी लढती 
पंचायत समितीच्या 26 गणांतही बहुतांश चौरंगी लढती होणार आहेत. सर्वाधिक आठ उमेदवार मांजरी बुद्रुक गणात आहेत; तर सर्वांत कमी दोन उमेदवार डोणजे गणात रिंगणात आहेत.

Web Title: District Council 63 candidates for the haweli