जिल्हा परिषदेच्या सर्व गटांसाठी उमेदवार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व 75 गटांसाठी कॉंग्रेसकडे इच्छुक उमेदवार तयार आहेत. त्यांचे अर्ज तालुका पातळीवर पक्ष कार्यालयात येत्या पाच जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुणे - पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व 75 गटांसाठी कॉंग्रेसकडे इच्छुक उमेदवार तयार आहेत. त्यांचे अर्ज तालुका पातळीवर पक्ष कार्यालयात येत्या पाच जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

जगताप म्हणाले, ""पुणे जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची स्थिती गेल्या वेळेपेक्षा खूपच चांगली असेल. कॉंग्रेस अनेक ठिकाणी जागा जिंकेल, तसेच काही गटांमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार विरोधकांना तुल्यबळ लढत देतील. इच्छुक उमेदवारांच्या तालुका पातळीवर मुलाखती घेण्यात येतील. काही ठिकाणी पाच जानेवारीला मुलाखती घेतल्या जातील. कॉंग्रेसतर्फे सहा आणि आठ जानेवारीला नोटाबंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे, त्या दोन दिवशी मुलाखती होणार नाहीत. मुलाखतीच्या तारखा स्थानिक पातळीवर जाहीर केल्या जातील.'' 

""नोटाबंदीमुळे सर्वसामान्य शेतकरी, कामगार, लहान व्यापारी, महिला त्रस्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात बॅंकांच्या पुरेशा शाखा नाहीत, एटीएमची सुविधा नाही. दुकानातून उधारी ठेवून मालाची खरेदी झाली, त्यामुळे लहान दुकानदारांचे खेळते भांडवल संपले. उधारी 40 टक्‍क्‍यांवर पोचली. स्वतःचे पैसे बॅंकेत असूनही ते वापरता येईनात. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अडचणीत आहे. लोक त्रस्त झाले आहेत. येत्या सात जानेवारीनंतर ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्‍यता आहे. जनतेचा हा आक्रोश आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आहोत. हे लोक सत्ताधारी भाजपच्या विरोधात जातील,'' असे जगताप यांनी सांगितले.

Web Title: District Council candidates for all groups