कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

न्यायालायच्या आतील पार्किंगचा सर्व परिसर बांबू आणि पत्रे यांच्या सहाय्याने सील करण्यात येणार असून थेट न्यायालयात जाण्यासाठी तीन गेट निर्माण करण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन करून पास दिल्यानंतरच मर्यादित वकील आणि पक्षकारांना इमारतीत जाता येणार आहे.

पुणे : न्यायालयीन कामकाजासाठी न्यायालयात येणाऱ्या पक्षकार व वकिलांना कोरोनाचा लागण होऊ नये किंवा त्यांच्यामुळे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा न्यायालय आतील बाजूने सील करण्यात येणार आहे. तसेच मर्यादित लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

पुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग  

न्यायालायच्या आतील पार्किंगचा सर्व परिसर बांबू आणि पत्रे यांच्या सहाय्याने सील करण्यात येणार असून थेट न्यायालयात जाण्यासाठी तीन गेट निर्माण करण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन करून पास दिल्यानंतरच मर्यादित वकील आणि पक्षकारांना इमारतीत जाता येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील आराखडा पुणे जिल्हा बार असोसिएशनने (पीबीए) उच्च न्यायालयाला पाठवला आहे. त्यात पत्रे मारून न्यायालयातील प्रवेश मर्यादित ठेवण्याबाबत बाबत काही मार्ग सुचवण्यात आले आहेत.

- विद्यार्थ्यांनो, रोजगार निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाचा घेतला 'हा' निर्णय

न्यायालय सुरू करण्याची आणि संबंधित उपायोजणांच्या अंमलबजावणीची परवानगी मिळाल्यानंतर त्वरित आतील बाजूतील पार्किंग आणि काही परिसर सील करण्यात येणार आहे. याबाबत पीबीएचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळीक यांनी सांगितले की, न्यायालयात येण्यासाठी गेट नंबर तीन आणि चार खुले असणार आहे. मात्र वकील व पक्षकार वाहन घेऊन न्यायालयात आल्यानंतर त्यांना थेट न्यायालयाच्या इमारतीत जाता येणार नाही. कारण पार्किंगचा सर्व परिसर पत्रे मारून सील करण्यात येणार आहे. वाहन पार्क केल्यानंतर संबंधित व्यक्ती इमारतीमध्ये जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या गेटवर सॅनिटाइझ केला जाईल. त्यानंतर त्यांच्या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन पास दिला जाईल. न्यायालायत गर्दी होणार नाही, शुल्कक काम असलेल्या व्यक्ती आत जाणार नाही, याची खबरदारी पास देताना घेतली जाईल. तसेच आत जाणाऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यायची याची थोडक्यात माहिती दिली जाईल. 

- पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ

विविध कामांसाठी न्यायालयात येणाऱ्या वकील आणि पक्षकारांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर नागरिकांचा वावर वाढणार आहे. सध्या न्यायालयात केवळ महत्वाच्या प्रकरणांवर सुनावणी होत असून पक्षकारांना न्यायालयात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या परिसरात असलेल्या भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठी आहे. त्याचा परिणाम न्यायालयात येणाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे, असे ऍड. मुळीक यांनी सांगितले. 

- विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता त्यांना मिळणारा बोर्डिंग पास हा...!

''न्यायालयीन कामकाज सुरू करण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज आम्ही उच्च न्यायालयास दिला आहे. मात्र पुण्यातील परिस्थिती पाहता तूर्तास न्यायालय सुरू होतील असे वाटत नाही. पण जेव्हा न्यायालये सुरू होतील तेव्हा काय खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचे नियोजन आम्ही करून ठेवले आहे. त्यास उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर सर्व उपाययोजना अमलात आणण्यात येणार आहे.'' 
- ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

- Video : श्रीकृष्ण मालिकेतला 'भीम' आहे पुणेकर; मराठमोळ्या महेंद्र घुलेंशी खास बातचीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Court will be sealed from within due to precautionary measures suggested by PBA