जिल्हा रुग्णालयच ‘आजारी’

District-Hospital
District-Hospital

पिंपरी - सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही. साफसफाईचा अभाव, परिसरातील बंद दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद, कॅंटीन नाही, अपुरे मनुष्यबळ आदी अत्यावश्‍यक बाबींच्या अभावामुळे रुग्ण, नातेवाईक व कर्मचारी यांचे हाल होत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला बूस्टर डोस देण्याची गरज आहे. 

पुणे जिल्ह्यासह, राज्याच्या विविध भागातून नागरिक येथे उपचारासाठी येत असतात. मात्र, रुग्णसंख्येच्या मानाने कर्मचारी वर्ग कमी आहे. त्यामुळे अनेक कामे रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत असतात. लॅबमध्ये रक्तासह विविध तपासणीचे रिपोर्ट शोधणे, विविध तपासणीसाठी रुग्णाला स्ट्रेचरवर घेऊन जाणे आदी कामे नातेवाईक करत असल्याचे चित्र आहे, तर शौचालय व बाथरूमची दिवसातून तीनदा स्वच्छता करण्याचे फलक रुग्णालयात लावले असतानाही शौचालयात दुर्गंधी असते. खिडकीचे पडदेही मळकट झाले असून, त्यांच्या ताराही तुटल्या आहेत. वॉर्डमध्ये मांजरांचा मुक्त संचार असतो. परिसरातील दिवे बंद असून, रात्री पूर्ण अंधार पसरलेला असतो.

लिफ्टचे आठ महिन्यांपूर्वी सर्व साहित्य पडून असून, त्याची जोडणी केलेली नसल्याने लिफ्टचे काम रखडले आहे. त्यामुळे दुसऱ्या लिफ्टवर ताण येतो. ओपीडीसाठी दररोज मोठी रांग लावलेली असते. मात्र, रुग्णांना बसण्यासाठी बाकड्यांची सुविधा नसल्याने त्यांना बराच वेळ रांगेत थांबावे लागते; तसेच रुग्णालयातील अनेक कर्मचाऱ्यांना आयडी कार्ड व गणवेशही नसतो, तर अनेक कर्मचारी हजेरी लावून बाहेर पसार होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे पाच वर्षांपासून बंद असून, या कॅमेऱ्यांची देखभालच झाली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

रुग्णालयात योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीने रुग्णाला दाखल करून घेण्याचे सांगूनही तेवढी तत्परता दाखवली जात असल्याचे रुग्णाचे नातेवाईक असलेल्या सुभाष पवार यांनी सांगितले. 

रुग्णांना जेवण निकृष्ट दर्जाचे 
रुग्णालयाकडून दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असते. काही वेळा जेवणात आळी निघत असल्याचे एका रुग्णाने सांगितले, नाष्टा अपुरा, तर अनेकदा मिळतही नाही.

रुग्णालयात स्वच्छता केली जाते. आयडी व गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना करणार असून, महिन्याला सुमारे २५ टक्के कर्मचारी सुटीवर असतात. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण पडतो. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग लवकरच सुरू केले जाईल. 
- डॉ. आर. के. शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com