फातिमानगर चौकात दुभाजकाची दुरवस्था 

jagdale2.jpg
jagdale2.jpg


पुणे ः वानवडी येथील फातिमानगर चौकात ट्रकच्या धडकेने रस्ता दुभाजक तुटले आहेत. दुभाजकावर रिफ्लेक्‍टर नसल्याने वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येत नसल्याने रात्रीच्या वेळी वारंवार दुभाजकांवर वाहने धडकतात. त्यामुळे तातडीने या दुभाजकाची दुरुस्ती करून त्याला रिफेल्टक्‍टर अथवा पिवळे-पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात यावे, जेणेकरून अपघात होणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 


वस्तुतः रस्त्यावरील दुभाजक हे वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी असतात, पण बीआरटी मार्गातील दुभाजकांची परिस्थिती नेमकी उलटी आहे. दुभाजक नेमके कधी सुरू होतात? याचा कसलाही अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने दुभाजकावर वाहने आदळून अपघात होण्याचे प्रमाणा वाढले आहे. ठिकठिकाणी तुटलेले दुभाजक, दुभाजकांवर रंग नसणे, उंचीबाबतची असमानता, दुभाजक सुरू होण्यापूर्वी आवश्‍यक असणारे पट्टे, तसेच रिफ्लेक्‍टर नसणे, असे प्रकार प्रत्येक रस्त्यावर असल्याने "सकाळ'च्या वतीने केलेल्या पाहणीत आढळून आले. 

स्थानिक रहिवासी अनिकेत राठी म्हणाले,""सोलापूर रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे. या मार्गावरील दुभाजकच आता धोकादायक ठरू लागले आहेत. काही ठिकाणी दुभाजक तुटले असून त्याचे तुकडे अस्ताव्यस्त रस्त्यावरच पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आता हे दुभाजक अडचणीचे ठरू लागले आहेत.'' 
रहिवासी संजय वरकड म्हणाले,""दुभाजकांवर गाडी चढल्याने मोठया प्रमाणात वाहनांचे नुकसान होते तसेच अपघातानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. हे दुभाजक खरंच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार बसविलेले आहेत का? हा एक संशोधनाचाच विषय बनला आहे. चुकीच्या पद्धतीने बसविलेल्या दुभाजकांमध्ये वाहनचालकांना वाहने चालवताना प्रचंड मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 
----------------------- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com