सावधान ! पुढे दुभाजक असेल...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

दुभाजकांच्या स्थितीबाबत वाहनचालक, पादचारी संतप्त

पुणे - शहरातील अनेक रस्त्यांवरील दुभाजकांअगोदर ‘पुढे दुभाजक आहे’, अशा आशयाचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहने दुभाजकांवर आदळत आहेत. परिणामी, वाहन चालविताना सावधानतेने चालविले पाहिजे, असा सल्ला वाहनचालकांनीच दिला आहे. दुभाजकांवर पांढरे पट्टेही अनेक ठिकाणी मारलेले नाहीत. दुभाजक तयार करताना नियमांचे पालन केलेले नाही.

त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे त्वरित हे दुभाजक योग्य प्रकारे उभारावेत, अशी मागणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली. 

दुभाजकांच्या स्थितीबाबत वाहनचालक, पादचारी संतप्त

पुणे - शहरातील अनेक रस्त्यांवरील दुभाजकांअगोदर ‘पुढे दुभाजक आहे’, अशा आशयाचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहने दुभाजकांवर आदळत आहेत. परिणामी, वाहन चालविताना सावधानतेने चालविले पाहिजे, असा सल्ला वाहनचालकांनीच दिला आहे. दुभाजकांवर पांढरे पट्टेही अनेक ठिकाणी मारलेले नाहीत. दुभाजक तयार करताना नियमांचे पालन केलेले नाही.

त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे त्वरित हे दुभाजक योग्य प्रकारे उभारावेत, अशी मागणी वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली. 

दुभाजक योग्य पद्धतीने नसल्याने दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपघाताच्या घटना दररोज घडत आहेत. याबाबत महापालिका गंभीर नसल्याची तक्रार वाहनचालकांनी केली असून, एखादी घटना घडल्यानंतर तात्पुरती डागडुजी होते, नंतर आहे तीच परिस्थिती कायम राहते. यात सुधारणा झाली पाहिजे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. 

सागर लोणारकर (बोपोडी) - शहरातील दुभाजकांची स्थिती अतिशय बिकट आहे. नेमके दुभाजक कुठे आहेत, हेही कळून येत नाही. दुभाजकावर पांढरे पट्टे नाहीत. शहरातील मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांची स्थितीही काहीशी अशीच आहे. बोपोडी भागातील बहुतांश ठिकाणी छोट्या भिंती असल्यासारखे दुभाजक बांधले आहेत. त्यावर उभे राहून पादचारी रस्ता ओंलाडतात; पण जवळून जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका संभवतो. यासाठी सर्वप्रथम महापालिकेने दुभाजकांची उंची वाढवावी. तसेच, वाहनचालकांसाठी त्यावर रिफ्लेक्‍टर बसविण्यात यावेत आणि दुभाजकांची उंची वाढविण्यात यावी.’’ 

हेमंत गांधी (कोथरूड) - शहरातील बहुतांश रस्त्यांवरील दुभाजकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याची उंची कमी असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी लोक त्यावर उभे राहतात. केवळ छोट्या भिंती बांधण्याचे काम महापालिकेने केले आहे. अनेक दुभाजकावर रिफ्लेक्‍टर नाहीत. त्यामुळे समोर दुभाजक आहे, हे लवकर कळत नाही. त्यामुळे वाहने सर्रास त्यावर आदळतात. जीवघेणे अपघातही होतात. पौड रस्त्यावर लोखंडी दुभाजक लावले आहेत. तशा प्रकारचे दुभाजक शहरात बसविणे आवश्‍यक आहे. ते सुरक्षित असून, त्यांना जागाही कमी लागते.’’

अक्षय बोरोले (सोलापूर रस्ता) - शहरात प्रामुख्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जाणवतो. त्यात अशा दुभाजकांमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वाहन वळविताना समोर दुभाजक येणार आहे, हे वाहनचालकाला माहिती नसते. कारण, तसे फलक लावले नाहीत. शिवाय दुभाजक तयार करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही उपाय केलेले नाहीत. त्यामुळे अपघात होणारच. काही ठिकाणी दुभाजकांची उंची एकसमान नाही, तर काही ठिकाणी दुभाजक आहेत की नाही, असा प्रश्‍न पडतो. त्यामुळे शहरात असलेल्या दुभाजकांची उंची वाढविण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘पुढे दुभाजक आहे’, अशा आशयाचा फलक लावावा. 

युवराज रणदिवे (हडपसर) - सोलापूर रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. या रस्त्यावर दुभाजक बसविताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार केलेला नाही. चौकाचौकांत दुभाजकाचा अंदाज येत नाही. त्यावर उभे असलेले प्रवासी अचानक रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते. अपघाताच्याही घटना घडतात. याला जबाबदार कोण? कोणी कुठूनही, कसाही रस्ता ओलांडतात. अनेक ठिकाणी दुभाजक तुटले आहेत. तेथून वाहने ये-जा करतात. महापालिकेने याची गंभीर दखल घेऊन आवश्‍यक उपाययोजना कराव्यात.’’

Web Title: divider in pune