esakal | 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवा; विभागीय आयुक्तांच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.Mhaisekar

‘आशा’ वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी ज्यांचे स्वास्थ्य उत्तम असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह अथवा कोणताही गंभीर आजार नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तपासणीची कामे करुन घ्यावीत.

14 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवा; विभागीय आयुक्तांच्या सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य
परिस्थिती लक्षात घेऊन 14 एप्रिलनंतर लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. याबाबतचा निर्णय सरकारच्या सूचनेनुसार संबंधित जिल्हाधिकारी घेतील, असे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ. म्हैसेकर यांनी शुक्रवारी (ता.१०) पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. कोरोनावरील उपाययोजना, औषधोपचार, वैद्यकीय सामग्री, अन्नधान्य पुरवठा याबाबत त्यांनी आढावा घेतला. 

- धडकी भरवणारी बातमी; २४ तासात मुंबईत तब्बल २१८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या...

डॉ. म्हैसेकर म्हणाले...
14 एप्रिलनंतर केद्र व राज्य सरकार लॉकडाऊन वाढविणार की टप्प्याटप्प्याने यामध्ये शिथिलता आणणार, याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नाही. विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल, याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.

- महाराष्ट्रानं पुणे जिल्ह्यातल्या 'या' गावाचा आदर्श घ्यावा; 100टक्के लॉकडाऊन!

कोरोनाबाधित रुग्णाची कोवीड केअर, कोवीड आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पिटल (सौम्य ते गंभीर) अशी त्रिस्तरीय विभागणी करुन वैद्यकीय उपचार करावेत. यामुळे उपचारावरील ताण कमी होईल. अडकलेले प्रवासी, मजूर यांची अन्न व निवासाची व्यवस्था करन बेघर नागरिकांचीही नाईट शेल्टर अथवा शाळेत निवारा व भोजनाची व्यवस्था करावी. साखर कारखाना क्षेत्रातील मजूर स्थलांतरीत होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करावी.

- तळीरामांचा संयम सुटला; खडकीत वाईन शॉप फोडून ७६ हजारांच्या दारूच्या बाटल्या लंपास

‘आशा’ वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी ज्यांचे स्वास्थ्य उत्तम असून, त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह अथवा कोणताही गंभीर आजार नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तपासणीची कामे करुन घ्यावीत. पुणे जिल्हयातील उप बाजार, आठवडी बाजार पूर्णत: बंद केले आहेत. आजवर आवक झालेल्या मालाची विक्री होईपर्यंतच भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करुन द्यावा. अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, औषधे, लिक्वीड सोप, साबण, तेल, दूध यांचा सुरळीत पुरवठा ठेवावा.