संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पहिल्याच तारखेला निकाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family Court
संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पहिल्याच तारखेला निकाली

संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा पहिल्याच तारखेला निकाली

पुणे - लाइफस्टाईल आणि स्वभावातील तफावतीमुळे वाद होत असल्याने तीन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटाचा (Divorse) दावा पहिल्या तारखेला निकाली (Result) काढला आहे. त्यांनी संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाचे (Family Court) प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी पती-पत्नी १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सुमारे तीन वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यांनी ११ डिसेंबर रोजी ॲड. खंडेराव टाचले, ॲड. मनीष मगर आणि ॲड. विजया गाढवे यांच्यामार्फत दाखल केलेला दावा पहिल्या तारखेला म्हणजे एक जानेवारी रोजी निकाली काढला.

हेही वाचा: पुणे : तेवीस गावात पाणीबाणी

यातील अर्जदार पती नागेश हा नगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील असून पुण्यात नोकरी करतो, तर पत्नी नेहा ही मूळची पुण्यातीलच असून ती गृहिणी आहे. एप्रिल २०१८ दोघांचे पारंपारिक पद्धतीने लग्न झाले होते. तो नोकरी करतो.

लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. दोघांना मूलबाळ नाही. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. निकालानुसार दोघांत स्त्रीधन, इतर दागदागिने, पैसे आणि संसारोपयोगी साहित्यावरून कोणतेही वाद नाहीत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneCourt
loading image
go to top