दिव्यांग प्रियंकाच्या लढाईला मिळतेय समाजाची साथ

स्वबळावर स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रियंका
प्रियंकाsakal

कोथरुड : ती दोन्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण तीचा आत्मविश्वास तसूभरही ढळलेला नाही. कोथरुडच्या आडबाजूला असलेल्या सुतारदरा येथून पिंपरी चिंचवडला ती रोज कामाला जाते. त्यासाठी तीला तीन बस बदलाव्या लागतात. पण त्याबद्दल तीची तक्रार नाही.

आपल्या जीवनावर गीत गात ती म्हणते,

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचूनी

लहरेन मी, बहरेन मी, शिशारातुनी उगवेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी

अशी उमेद घेवून दृष्टी अंध असलेली प्रियंका जीवनाची लढाई आत्मनिर्भरतेने लढत आहे. तीची जिद्द, आत्मविश्वास इतरांना प्रेरणादायी ठरत आहे.

मुळची बारामतीची असलेली प्रियंका चंद्रकांत धुमाळ स्वबळावर स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. संगितशास्राची व्दीपदवीधर असलेली प्रियंका नेटसेट परिक्षेची तयारी करत आहे. महानगरपालिकेत निघालेल्या नोकर भरतीमध्ये ती आपले नशिब आजमावणार आहे.

सुतारदरा येथील चाळीतील एका खोलीत प्रियंका राहते. ज्या गल्लीबोळातून चालताना डोळसही ठेचकाळतात तेथे प्रियंका सारखी दृष्टीअंध मुलगी कशी जाते असे विचारले तर ती म्हणते, माझी काठी आहे ना. या काठीच्या आधारावर मी कोठेही जावू शकते. कामाला जाण्यासाठी तीन वेळा बस बदलतेच की मी. इंदिरानगर चिंचवड येथे ती राखी बनवण्याचे काम करते. यातील काही राख्या संध्याकाळी ती सुतारदरा येथे विकते. समर्थ मेडिकलचे संदीप कुंबरे यांनी त्यासाठी प्रियंकाला जागा दिली आहे. संधी मिळेल तसा छोटामोठा जॉब करत उपजिविका भागविणा-या प्रियंकाचे स्वप्न आत्मनिर्भरतेचे आहे. ती म्हणते, मला स्वावलंबी बनायचे होते. कोणावरही अवलंबून रहायचे नाही. गावाला आई, वडील, भाऊ सगळे आहेत. पण मला माझे अस्त्तित्व तयार करायचे आहे. म्हणूनच म्हणते की, एकाच या जन्मी जणू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com