सोशल मीडियावर "व्हिडिओ'द्वारे शुभेच्छांचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

पुणे - दिवाळी हा प्रकाशोत्सव...याच उत्सवाला मांगल्याच्या आणि भरभराटीच्या शुभेच्छा देण्याची रीत आहे. हाच शुभेच्छांचा वर्षाव अन्‌ दिवाळीचा रंग सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरही अनुभवायला मिळत आहे. नेटिझन्सकडून आपल्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यात येत आहे. कोणी व्हिडिओतून, तर कोणी संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे. यंदा "ग्राफिक्‍स इंटरचेंज फॉर्मेट' (जीआयएफ) या फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवरील नव्या फंग्शनमुळे दिवाळीच्या शुभेच्छा खास दहा ते वीस सेकंदाच्या व्हिडिओमधून व्यक्त केल्या जात आहेत.

पुणे - दिवाळी हा प्रकाशोत्सव...याच उत्सवाला मांगल्याच्या आणि भरभराटीच्या शुभेच्छा देण्याची रीत आहे. हाच शुभेच्छांचा वर्षाव अन्‌ दिवाळीचा रंग सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरही अनुभवायला मिळत आहे. नेटिझन्सकडून आपल्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यात येत आहे. कोणी व्हिडिओतून, तर कोणी संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे. यंदा "ग्राफिक्‍स इंटरचेंज फॉर्मेट' (जीआयएफ) या फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवरील नव्या फंग्शनमुळे दिवाळीच्या शुभेच्छा खास दहा ते वीस सेकंदाच्या व्हिडिओमधून व्यक्त केल्या जात आहेत. या नव्या फंग्शनची सध्या सोशल नेटवर्किंगवर चलती असून, या व्हिडिओमुळे यंदाची दिवाळी काहीशी खास बनली आहे.

गेल्या चार दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साइट्‌सच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या जात आहेत. एकमेकांशी शुभेच्छा संदेश पाठवून दिवाळी त्यांना आनंदाची आणि भरभराटीची जावो, ही कामना करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोशल नेटवर्किंग साइट्‌सच्या जगात नवे पर्याय आणि नवे फंक्‍शन उपलब्ध झाले आहेत. त्याचा वापर करून तरुणाई दिवाळी सेलिब्रेट करत आहेत. त्यात फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर पाठविल्या जाणाऱ्या "जीआयएफ'च्या छोट्या व्हिडिओमुळे दिवाळी काहीशी खास बनली आहे. याच दहा ते वीस मिनिटांच्या व्हिडिओत दिवाळीचे महत्त्व, फराळ आणि फटाक्‍यांची आतषबाजी दिसायला मिळेल; पण हे व्हिडिओ कुठेतरी नेटिझन्ससाठी वेगळेपण घेऊन आले आहेत.

जीआयएफ व्हिडिओशिवाय सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर घरच्या दिवाळीचे प्रत्येक क्षण न्‌ क्षण शेअर केले जात आहेत. दिवाळीनिमित्त गावी गेलेले तरुण-तरुणी "गावच्या दिवाळी'चे छायाचित्र आणि आठवणी शेअर करत आहेत, तर काहीजण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य, त्यांनी केलेला पेहराव आणि कुटुंबीयांसोबत घालविलेल्या प्रत्येक क्षणाचा व्हिडिओ आणि छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करत आहेत. फेसबुकवरही शुभेच्छा संदेश पाठविणाऱ्यांचीही कमतरता नाही. कोणी फराळाचे फोटो पोस्ट करत, तर कोणी आकर्षक पद्धतीने संदेश लिहून ते एकमेकांना पाठवीत आहेत.

व्हॉट्‌सऍपवर गेल्या चार-पाच दिवसांपासून शुभेच्छा संदेश पाठविले जात आहेत. कोणी जीआयएफ व्हिडिओ पाठवून, कोणी ग्राफिक डिझाईन केलेले छायाचित्र पाठवून, तर कोणी स्वत: लिहिलेले संदेश पाठवून दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हाईकवर "हॅप्पी दिवाळी'च्या वेगळ्या स्माईली पाठवून दिवाळीला विश केले जात आहे, तर फेसबुकवर कविता, किस्से आणि ग्राफिक डिझाईन केलेले आकर्षक छायाचित्र पाठवून नेटिझन्स दिवाळीला एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. एकूणच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्‌सऍप आणि हाईकवर दिवाळीचा रंग बहरला आहे.

याबाबत मनीष लोहार म्हणाला, ""ज्यांच्यापर्यंत आपण पोचू शकत नाही, त्यांना फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपद्वारे शुभेच्छा देता येतात. त्यामुळे एकावेळी आपण खूप लोकांना शुभेच्छा देऊ शकतो. मी पण मित्र-मैत्रिणींना फेसबुकद्वारे विश केले. अजूनही खूपजण बाकी आहेत; पण यातून जो आनंद मिळतो, तो काही औरच असतो. एकमेकांना शुभेच्छा दिल्याचेही समाधान मिळते आणि दिवाळी आणखीन खास होते.''

 

Web Title: Diwali celebration on Social Media