आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पुण्यात दिवाळी

पर्वती पायथा - भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुण्यजागर उपक्रमाच्या निरोप समारंभामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी जादूच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
पर्वती पायथा - भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुण्यजागर उपक्रमाच्या निरोप समारंभामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी जादूच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

पुणे - भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यजागर प्रकल्पाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी पुण्यातील काही कुटुंबांच्या घरी साजरी करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून गेले आठ दिवस २६ कुटुंबांनी शहराच्या विविध भागांतील कुटुंबीयांसोबत राहून दिवाळी साजरी केली.

या कुटुंबीयांचा निरोप समारंभ लक्ष्मीनगर येथे झाला. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, अभिनेत्री जयमाला इनामदार, नगरसेविका सरस्वती शेडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भाई, वंजार वाडकर आदी उपस्थित होते. 

कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘आत्महत्याग्रस्त कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सरकारबरोबर प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून ही जबाबदारी पार पाडली जात आहे.’’

‘‘आत्महत्या करण्याची वेळ कोणत्याही शेतकऱ्यावर येऊ नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे आहेत,’’ असे जाधव यांनी सांगितले.  या वेळी जादूचे प्रयोग तसेच विविध मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com