Diwali Festival 2020 : बांबूपासून तयार होणारे आकाशकंदील यांना मिळतीय मोठी मागणी

सुस्मिता वडतिले 
Friday, 13 November 2020

जंगलतोडीच्या आजच्या युगात इकोफ्रेंडली बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. आज बदलेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू, पदार्थ आणि रसायन समाजातील सर्व घटक व्यापार-व्यवसायासाठी फायदेशीर आहेत. बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यात दिवाळीमधील आकाशकंदील, लॅम्प आणि झुरमुळे ही बाजारात विक्रीस आलेले दिसून येत आहे.

पुणे : दिवाळी सण सर्वत्र साजरा केला जाणारा आहे. जो तो दिवाळी म्हणलं तर आठ दहा दिवसांपासून तयारीला लागत असतो. त्यात फराळ, आकाशकंदील, नवीन कपडे आणि बरच काही खरेदी सुरूच असतं. बाजारात दरवर्षी नव नव्या वस्तू विक्रीस येतात. त्यात सध्याच्या फॅशनच्या दुनियेत स्पर्धेत टिकाव धरू शकेल, अशी दर्जेदार उत्पादने म्हणजेच बांबूपासूनसुद्धा तयार होऊ लागली आहेत. त्या वस्तूंना ही मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे.  

जंगलतोडीच्या आजच्या युगात इकोफ्रेंडली बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर आहेत. आज बदलेल्या परिस्थितीत व प्रदूषणयुक्त वातावरणात बांबू, बांबूशेती, बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू, पदार्थ आणि रसायन समाजातील सर्व घटक व्यापार-व्यवसायासाठी फायदेशीर आहेत. बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यात दिवाळीमधील आकाशकंदील, लॅम्प आणि झुरमुळे ही बाजारात विक्रीस आलेले दिसून येत आहे.

No photo description available.

बांबूच्या काड्या, बांबूचे पेर त्याला आकर्षक नक्षीकाम आणि रंगकाम करून विशिष्ट कोणात केली जाणारी बांधणी आणि त्यातून तयार होणारे रंगीबेरंगी आकाशकंदील दिवाळीत आणखीन रोषणाई करणार आहेत. बाजारात बांबूपासून तयार केलेले आकाशकंदील आल्यामुळे त्यांना चांगली मागणी मिळत आहे. 

बांबूवर आधारित वस्तूंचा वापर ही सध्याची 'फॅशन' आहे. घराच्या सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. अलीकडच्या काळात प्लॅस्टिक बंदीमुळे बांबू वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यात बांबूपासून अनेक वेगवेगळ्या वस्तू ही बनवल्या जात आहेत. तसेच त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणीसुद्धा आहे. या वस्तूंकडे अनेकांचे आकर्षण वाढत चालले आहे. बांबू सारखी वनस्पती आज पर्यावरणा संतुलनाबरोबरच अर्थार्जनाचे साधन निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे बांबू बहुगुणी असल्यामुळे या वस्तूंच्या निर्मितीला खूप मोठा वाव आहे. 

No photo description available.

आकाशकंदील बनवण्यासाठी या प्रकारचा लागतो बांबू 
 
आकाशकंदील बनवण्यासाठी मेसकाटी (कागदी चिवा) प्रकारचा बांबू वापरण्यात येतो. दोन इंच जाडीचा व 24 फूट लांबीचा चिवा फोडून पट्ट्या तयार केल्या जातात. गरजेनुसार आकार करून त्यावर प्रक्रिया केली जाते. आणि आकाशकंदील बनवले जातात.  

विंड चाईम तयार केला जातो

आकाश कंदील तयार करताना शेंड्याकडील शिल्लक राहिलेल्या चिव्याचा उपयोग विंड चाईम तयार करण्यासाठी केला जातो. अनेक प्रकारचे विंड चाईम तयार केली जातात. वाऱ्याची झुळूक येताच घरात अडकवलेल्या या विंड चाईममधून मधुर ध्वनी निर्माण होतो.

बांबूपासून तयार वस्तूंना या दिवसात विशेष मागणी

बांबूपासून अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जात आहेत. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी ही मिळत आहे. विशेष करून दिवाळीत बांबूचा आकर्षक असणारा आकाश कंदील, लॅम्प, झुरमाळे, बांबूची विविध स्ट्रक्‍चर्स यांना मोठी मागणी असते. 

बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदीलचे प्रकार 

बांबूपासून आकाशकंदील बनवताना त्यात चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी असे सुमारे 35 प्रकारचे आकाश कंदील बनवले जातात. ते आकाशकंदील बनवायला तीन ते चार तास लागतात. 

बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदीलच्या किंमती

बांबूपासून तयार केलेल्या आकाशकंदीलच्या किंमती 300 रुपयांपासून आहेत. पहिल्यांदा असे आकाशकंदील बाजारात आल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद आहे

किरण सूर्यवंशी म्हणाले, अलीकडच्या काळात प्लास्टिकच्या बंदीमुळे बांबू वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. कलाकुसरीच्या अनेक वस्तू तयार करण्यात हातखंडा असलेला हा समाज अनेक कलाकुसरीच्या वस्तू तयार करतो. दिवाळीमध्ये बांबूपासून आकाश कंदील, लॅम्प, झुरमाळे, बांबूची विविध स्ट्रक्‍चर्स या वस्तूंना चांगली मागणी मिळत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diwali Festival 2020 : Sky lantern made of bamboo are in great demand