चैतन्याचा आविष्कार फुलला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पुणे - मनात साचलेल्या निराशेची काजळी फुंकत, चैतन्याचा आविष्कार फुलविणाऱ्या लख्ख प्रकाशाच्या सणाला आजपासून सुरवात झाली. या सणाचा पहिला दिवा दारी लागला. वसुबारस, धन्वंतरी जयंती, धनत्रयोदशी आणि गुरुद्वादशी एकाच दिवशी आल्याने पुणेकरांनी सवत्स धेनूपूजन, धन-धान्य, सोने-नाणे तसेच व्यापाऱ्यांनी हिशेब वह्यांची खरेदी आणि पूजन, तर वैद्यकीय क्षेत्राने धन्वंतरीचे पूजन केले. 

धनत्रयोदशीमुळे झेंडूसंह फुलांना मागणी वाढली होती. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होती. व्यापाऱ्यांनी वह्यांची खरेदी केली. दुकाने फुलांनी सजवून रोषणाई केली होती. धन-धान्याची आणि देवपूजेची परंपरा कायम राखत प्रत्येक घरातील सुवासिनीने आज पहिला दिवा दारी लावला. सुबक रांगोळ्यांच्या रंगीबेरंगी आकृत्यांनी आंगण, सदनिकेसमोरील जागाही सजल्या होत्या. वसुबारसेचा मुहूर्त साधत सवत्स धेनू करण्यात आले. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, गोधनाप्रती आदर व्यक्त करण्याची परंपरा सवत्स धेनूच्या पूजनातून पूर्ण करण्यात आली.  

धन्वतरी जयंतीमुळे महाविद्यालयांसह वैद्यकीय क्षेत्राने मनोभावे आरोग्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या धन्वंतरी देवतेचे पूजन केले. त्यासाठी रांगोळी आणि फुलांची सजावटही अनेक ठिकाणी केली होती. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गुरूला नमन करण्याचे वेगळे महत्त्व आहे.

खरेदी अजूनही सुरूच
दिवाळाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. सकाळी ढगाळ वातावरण, त्यानंतर पावसाने शिडकावा दिल्याने खरेदी मंदावली होती; परंतु दुपारच्या वेळी उघडीप दिल्याने पुन्हा पेठा फुलल्या होत्या. बाजारपेठांमध्ये गर्दी असल्याने वाहतूक कोंडीचे प्रकारही या भागांमध्ये घडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Diwali festival begins today