दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचाही आनंद

कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीच्या सुटीचा आनंद घेताना पर्यटक.
कात्रज - राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीच्या सुटीचा आनंद घेताना पर्यटक.

पुणे - बागांमध्ये फिरायचे. लहानग्यांसोबत खेळायचे आणि त्यांना वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, अस्वल दाखवायचे! याचसाठी दिवाळी पर्यटनाला नागरिक घराबाहेर पडत आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिवाळीची सुटी लागल्यापासूनच देश-विदेशातील पर्यटक बहुसंख्येने येत आहेत. शनिवारी तर वीस हजारांच्या आसपास पर्यटकांनी भेट दिली. शहरातील उद्यानेही पर्यटकांनी बहरली आहेत. 

अनेकांनी नातेवाईक, मित्र परिवासोबत दिवाळीचा आनंद घ्यायचा म्हणून आठवडाभराची रजा काढली आहे. दिवाळीतल्या प्रत्येक दिवशी पर्यटकांच्या उपस्थितीने शहर व उपनगरांतील बागा फुलल्या आहेत. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला तर एक ते दहा नोव्हेंबरपर्यंत ६२,१७२ पर्यटकांनी भेट दिली आहे. सारसबाग, पु. ल. देशपांडे उद्यान, संभाजी बाग यासह अन्य बागांमध्ये जाऊन खेळण्याचा आनंद बच्चेकंपनी घेत आहे. प्राणिसंग्रहालयाचे उपसंचालक डॉ. एन. के. निघोत म्हणाले, ‘‘प्राणिसंग्रहालयात ६७ प्रजातींचे ४२३ प्राणी आहेत. दिवाळीनिमित्त दररोज पर्यटक उत्स्फूर्तपणे प्राणिसंग्रहालयास आनंदाने भेट देत आहेत.’’

मी सोलापूरहून दिवाळीनिमित्त पुण्यात आले आहे. माझ्या मुलांसह मी प्राणिसंग्रहालयास भेट दिली. येथील वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी मुलांना दाखविले. त्यांनाही प्राणी पाहत सुटीचा आनंद घ्यायला मिळाला. दिवाळीच्या सुटीनिमित्त वेगवेगळ्या बागा व प्राणिसंग्रहालयांस भेट द्यायला पाहिजे. त्यामुळे मुलांनाही आनंद मिळेल.
- अंजली देशपांडे, पर्यटक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com