बनवा आकर्षक आकाशकंदील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कार्यशाळेविषयी...
कधी - रविवार, २० ऑक्‍टोबर २०१९
केव्हा - सकाळी ११ ते १२.३० 
शुल्क - १०० रुपये 
प्रवेश - सर्व वयोगटासाठी 
संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३ 
महत्त्वाचे - नावनोंदणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊनच करावी. फोनवर नोंदणी करता येणार नाही. कार्यशाळेसाठी जागा मर्यादीत आहेत.

पुणे - स्वत:च्या हाताने एखादी वस्तू तयार करण्याची मजा काही औरच असते. यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या हाताने तयार केलेले आकाशकंदील लावण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. ‘सकाळ यंग बझ’तर्फे आकाशकंदील बनविणे कार्यशाळा २० ऑक्‍टोबर रोजी विविध ठिकाणी होणार आहे.

कलात्मक कंदील सोप्या पद्धतीने कसे तयार करावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यंदाच्या दिवाळीत मुलांना या वस्तूंच्या साह्यानेही घर सजविता येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जुनी वृत्तपत्रे, फेव्हिकॉल, स्टेप्लर आदी साहित्य घरून आणावे लागणार आहे. कंदील तयार करण्यासाठी लागणारे इतर सर्व साहित्य ‘सकाळ’कडून देण्यात येईल. ही कार्यशाळा सर्व वयोगटांसाठी असून पुणे व पिंपरी परिसरातील निवडक शाळा व मॉल्समध्ये होणार आहे. सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

कार्यशाळेची ठिकाणे...
फिनिक्‍स मार्केटसिटी (विमाननगर), पाठशाळा (बालेवाडी व रहाटणी), पी. जोग हायस्कूल (सिंहगड रस्ता व कोथरूड), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड), अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (मोशी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), अभिरुची मॉल ॲण्ड मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), ग्लोबल स्टार प्री-स्कूल (धायरी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali lantern making workshop by sakal