जेजुरीत उजाडली मंगल सुरात दिवाळी पहाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

जेजुरी - जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने आज (शुक्रवारी) येथील ऐतिहासिक छत्री मंदिरावर आयोजित "दिवाळी पहाट' कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते यांच्या गायनाने चांगलाच रंग भरला.
जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने सलग दहाव्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खंडोबा गडाच्या

जेजुरी - जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने आज (शुक्रवारी) येथील ऐतिहासिक छत्री मंदिरावर आयोजित "दिवाळी पहाट' कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते यांच्या गायनाने चांगलाच रंग भरला.
जयाद्री मित्र परिवाराच्या वतीने सलग दहाव्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खंडोबा गडाच्या

ऐतिहासिक मल्हार-गौतमेश्‍वर छत्री मंदिराच्या पटांगणात आजची पहाट सुमधुर भक्तिगीते, भावगीते व खंडोबाच्या गीतांनी बहरली. पुण्याच्या स्वरांजली ग्रुपचे कलावंत उमेश साळुंखे, महेश साळुंखे, स्नेहल ढोसर, मीरा या गायकांनी गीते सादर केली. जयाद्री कन्या मेधा पवार व सिद्धता नाझिरकर यांनी या वेळी कथक नृत्य सादर करून वाहवा मिळवली.

विजयकुमार हरिश्‍चंद्रे यांनी निवेदन केले. उज्ज्वला जगताप यांनी रांगोळी सजावट केली. घनश्‍याम सुंदरा, मनमंदिरा, सूर निरागस हो, गणपती, आली माझ्या घरी ही दिवाळी, शंभो शिवशंकरा-करुणाकरा, मोरया-मोरया, पाहावा विठ्ठल, दिगंबरा दिगंबरा तसेच खंडोबा देवाची गीते सादर करून कलावंतांनी रसिकांची मने जिंकली. देवसंस्थानचे विश्‍वस्त सुधीर गोडसे, माजी विश्‍वस्त डॉ. नारायण टाक, बाजार समितीचे संचालक ऍड. धनंजय भोईटे, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, पदाधिकारी रवींद्र जोशी, राजेश पाटील, हरीश चामे, प्राचार्य नंदकुमार सागर, सचिन पेशवे आदी यावेळी उपस्थित होते. जयाद्री परिवाराचे कुमार पवार, गणेश टाक, विजयकुमार हरिश्‍चंद्रे, अतुल आगलावे, धनंजय केळकर, प्रशांत नाझरेकर, सचिन झगडे, रमेश सोनवणे, एकनाथ शेरे, श्‍लोक हरिश्‍चंद्रे आदींनी नियोजन केले.

डीवायएसपी भरते यांच्या गायनाला दाद
उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते यांनी "फुलों के रंग से, दिल की कलम से' या किशोर कुमार यांच्या गीताचे गायन केले. पोलिस अधिकाऱ्यातील कलावंत पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

Web Title: Diwali pahat in Jejuri