पुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या वतीने लक्ष्मीपूजनाच्या पहाटे (बुधवारी) "दिवाळी पहाट रन' आयोजिली आहे.
साडी, पैठणी, शालू, कुडता, पगडी, टोपी अशा पारंपरिक वेशभूषेसह देवदर्शनाचा लाभ घेत आरोग्यदायक दीपावलीसाठी आनंदाने यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मॅरेथॉनच्या आयोजकांनी केले आहे.
शनिवारवाडा येथून सकाळी सहा वाजता "दिवाळी पहाट रन' सुरू होईल. कसबा गणपती मंदिर देवस्थान, दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे मंदिर, रामेश्वर विष्णू मंदिर, श्रीमंत भिकारदास मारुती मंदिर, चिमण्या गणपती मंदिर, खुन्या मुरलीधर मंदिर, पत्र्या मारुती मंदिर, दक्षिणमुखी मारुती मंदिरमार्गे पुन्हा शनिवारवाडा अशी ही रन असेल. दीपावलीच्या निमित्ताने या रनच्या माध्यमातून ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संकल्प सोडण्याची ही संधी पुणे हाफ मॅरेथॉनने पुणेकरांसाठी आणली आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता नावनोंदणी मोफत आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क : http:www.bajajallianzpunehalfmarathon.com
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.