दिवाळीतील प्रदूषणाच्या पातळीत यंदा किंचित घट 

Diwali pollution levels decline slightly this year
Diwali pollution levels decline slightly this year

पुणे - दिवाळी म्हणजे फटाक्‍यांची आतषबाजी. या काळात प्रदूषणाचे प्रमाणही वाढते; परंतु, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा दिवाळीच्या काळात ध्वनिप्रदूषणाची पातळी फार ओलांडली गेलेली नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा प्रदूषण पातळीत किंचत घट, तर रात्री किंचित वाढ झाली. मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यंदा प्रदूषणाची सरासरी पातळी घटली आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात शिवाजीनगर (सहकार संकुल), कर्वे रस्ता, सातारा रस्ता, स्वारगेट, येरवडा, खडकी, कोथरूड, शनिवार वाडा, लक्ष्मी रस्ता, मंडई, सारसबाग, कोरेगाव पार्क, औंध गाव, विश्रांतवाडी आणि पुणे विद्यापीठ रस्ता या भागातील दिवसा आणि रात्रीच्या वेळेतील प्रदूषण पातळीची नोंद घेतली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीबरोबर त्याची तुलनादेखील केली आहे. मुख्यत्वे यंदा 27 तारखेचे लक्ष्मीपूजन आणि नरक चतुदर्शीच्या दिवसाची तसेच भाऊबिजेच्या दिवशीची आकडेवारी मंडळाने दिली आहे. 

यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवसा कर्वे रस्ता, स्वारगेट, कोथरूड, लक्ष्मी रस्ता, मंडई या भागात प्रदूषणाची पातळी 75 ते 87 डेसीबलपर्यंत नोंदविली गेली. गेल्या वर्षीसारखेच हे आकडे असले, तरी त्या किंचत घट दिसते. गेल्या वर्षी ही पातळी 75 ते 87.7 डेसिबलपर्यंत गेली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या भागात रात्रीच्या काळातील ध्वनिप्रदूषणाची पातळी ही 63 ते 76.9 डेसिबलपर्यंत होती. गेल्या वर्षी भाऊबिजेच्या दिवशी प्रदूषणाची पातळी दिवसा 72.6 ते 85.5 डेसिबलपर्यंत आणि यंदा 71.3 ते 79.9 डेसिबलपर्यंत नोंदली गेली. गतवर्षी रात्री ही पातळी 57.9 ते 67.3 डेसिबलपर्यंत, तर यंदा 59.2 ते 71.3 डेसिबलपर्यंत नोंदली गेली. 

मंडळाच्या आकडेवारीनुसार 27 तारखेला हवा प्रदूषणाची पातळी समाधानकारक नोंदविली गेली आहे. या दिवशी हवेच्या गुणवत्तेचा मानांक 85 एवढा होता. त्यामुळे हवेतही चिंताजनक प्रदूषण नव्हते. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक महेश शिंदीकर म्हणाले, ""दरवर्षीपेक्षा यंदा फटाक्‍यांचा आवाज कमी होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी मर्यादित राहिली. शालेय मुलांमध्येच फटाक्‍यांबाबत अधिक जागरूकता दिसते. आवाजाच्या फटाकाच्या प्रकाशाचे फटाक्‍यावर भर होता.'' 

ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत यंदा घट दिसून येत आहे. नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषणाबाबत झालेली जागृती, तसेच फटाक्‍यांच्या उत्पादनाच्यावेळी घातलेले निर्बंध आणि विक्रेत्यांकडील फटाक्‍यांची दिवाळीपूर्वी होत असलेल्या चाचणीमुळे प्रदूषण पातळी नियंत्रित ठेवण्यात यश आलेले आहे. 
- दिलीप खेडकर, अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com