पुणे - दरवर्षी दिवाळीत मी घरासाठी एक तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू नक्की घेतो. त्यावेळी दुकानांमध्ये सेल असतो. यंदा, मात्र कोरोनामुळे दुकानात जाऊन खरेदी करणे सुरक्षित आणि परवडणारे नसणार. त्यात सध्या ऑनलाइन खरेदीसाठी सवलती मिळत आहे. त्यामुळे दिवाळीची खरेदी मी ऑनलाइनच करणार असल्याचे वैशाख नंबियार यांनी सांगितले.
वैशाख हा २८ वर्षीय तरुण खासगी कंपनीत काम करतो. त्याच्या कुटुंबात आई, बाबा आणि लहान भाऊ आहे. यंदा त्याने ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. दिवाळीच्या खरेदीची बदलती मानसिकता अभ्यासणारा ‘टीआरए रिसर्च’चा (ट्रस्ट रिसर्च ॲडव्हायसरी) ‘दिवाळी २०२० बाईंग प्रायॉरिटी रिपोर्ट’ नुकताच प्रकाशित झाला. यामध्ये ग्राहकांचे दिवाळी खरेदीबाबत मत, कोणत्या वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या जाऊ शकतील, याची माहिती घेतली. या सर्वेक्षणानुसार ६५ टक्के ग्राहकांनी दिवाळी खरेदीबद्दल सकारात्मक भावना दाखविली आहे. यामध्ये ग्राहकांनी कपडे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स व दुचाकी खरेदीस सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. तसेच, ऑनलाइन खरेदीवर भर असल्याचेही स्पष्ट झाले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यंदाची दिवाळी अनेक ब्रॅंडसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सद्यः परिस्थितीत अर्थव्यवस्था मंदावल्याने कोरोनापूर्वी ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण कमी झाले होते, असे टीआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, एन चंद्रमौली यांनी सांगितले.
असे केले सर्वेक्षण
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.