पुण्यात 'डीजे'चे नियम फाट्यावर; सर्रास दणदणाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

विश्रामबाग गणेश मंडळाने डीजेला परवागी नसल्याने निदर्शने केली. तर, गुरुदत्त मंडळाने टाळ वाजवून निदर्शने केली. टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर सर्रासची डीजेचा दणदणाट सुरु होता. पोलिसांनीही समज देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय पुण्यात अनेक गणेश मंडळांकडून फाट्यावर मारल्याचे दिसून आले.

पुणे : उच्च न्यायालयाने "स्पीकर'वरील बंदी कायम ठेवली असली तर पुण्यात सर्रास अनेक मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मंडळातील कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच डीजे वाजविण्यास सुरवात केली होती. तर, काही ठिकाणी डीजेला परवानगी नसल्याने निदर्शने झाल्याचे पाहायला मिळाले. 

डीजेला बंदी असल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयासमोर राज्य सरकारने योग्य बाजू मांडली नसल्याचा आरोप करीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला होता. ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून "साउंड सिस्टिम'वर (स्पीकर) बंदी घालण्यात आल्याचा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता. या निर्णयाविषयी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. बंदी कायम राहिल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते शनिवारी पत्रकार भवन येथे एकत्र झाले होते. गणपती विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळे सहभागी न झाल्याचे समजते. 

विश्रामबाग गणेश मंडळाने डीजेला परवागी नसल्याने निदर्शने केली. तर, गुरुदत्त मंडळाने टाळ वाजवून निदर्शने केली. टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर सर्रासची डीजेचा दणदणाट सुरु होता. पोलिसांनीही समज देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय पुण्यात अनेक गणेश मंडळांकडून फाट्यावर मारल्याचे दिसून आले. सोमवारी सकाळी प्रमुख रस्त्यांवर डीजे घेऊन आलेल्या मंडळांना बंदी घातल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

Web Title: DJ Sound system play in Pune during Ganpati immersion