देश स्वतंत्र झाल्यापासून ते करत आहेत मतदान!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

देशात स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या पहिल्या उत्साहवाचे साक्षिदार असलेल्या ज्ञानेश्वर सदाशिव कुलकर्णी यांनी या विधानसभा निवडणुकीतही आपला मतदानाचा हक्क बजावला.

पुणे : देशात स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या पहिल्या उत्साहवाचे साक्षिदार असलेल्या ज्ञानेश्वर सदाशिव कुलकर्णी यांनी या विधानसभा निवडणुकीतही आपला मतदानाचा हक्क बजावला. कुलकर्णी यांनी वयाच्या शंभराव्या वर्षी देखील चालत येत कोथरूडमधील मोरे विद्यालय केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

देश स्वतंत्र झाल्यानंतर 1952 मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचे साक्षीदार ज्ञानेश्वर कुलकर्णी आहेत. त्यांनी देशाच्या पहिल्या निवडणुकीत मतदानाचा.हक्क बजावला होता. त्यानंतर आजतागायत प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मोरे विद्यालय केंद्रावर पायी चालत येत त्यांनी मतदान केले. 

कुलकर्णी हे कोथरूडचे रहिवासी असून गिरीजा सोसायटीमध्ये ते राहतात. आपल्या मुलाबरोबर त्यांनी मतदानाचा हक्क बजावत, लोकशाहीच्या मजबुतीसाठी प्रत्येकाचे मत अतिशय महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी आपल्या मतदानातून दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Kulkarni is voting since Indias first general election