घरे अनधिकृत बांधायची का?

Home
Home

खडकवासला - शहरालगत असलेल्या कोंढवे-धावडे गावचा अद्यापही सिटी सर्व्हे (नगररचना) झाला नाही. यामुळे या भागातील नागरिकांना नवीन घरांचे बांधकाम करता येत नाही. परिणामी, आम्ही घरांचे बांधकाम अनधिकृत करायचे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहर परिसरातील काही गावे ‘पीएमआरडीए’ हद्दीत आहेत. या भागात बांधकामांसाठी परवानगी पाहिजे असेल, तर त्या जागेची सरकारी मोजणी झालेली असली पाहिजे, असा नियम पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात येतो. कोंढवे-धावडे परिसरातील अनेक गावांचा अद्यापही सिटी सर्व्हे (नगररचना) झाला नाही. त्यामुळे गावठाणातील जागेची मोजणीही झाली नाही. परिणामी, नागरिकांना नवीन बांधकामांसाठी परवानगी मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने गेल्या जानेवारी महिन्यात ठराव मोजणीसंदर्भात ठराव केला. त्यानंतर तो हवेली तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही. गावठाणाचा सर्व्हे झाला नसल्याने ‘पीएमआरडीए’कडून बांधकामांसाठी परवानगी मिळत नाही. भूमी अभिलेख कार्यालय आणि पीएमआरडीएच्या कारभाराला नागरिक वैतागले आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा व तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील प्रमुख राजेंद्र गोळे यांची भेट घेतली. सिटी सर्व्हे  तातडीने करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. येत्या दोन-तीन महिन्यांत हा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
- नितीन धावडे, सरपंच, कोंढवे धावडे

सिटी सर्व्हेसाठी येणारा सर्व खर्च ग्रामपंचायत नियमाप्रमाणे भरण्यास तयार आहे. मात्र, अद्याप हा सर्व्हे झाला नाही. तो कधी होणार, याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे.
- हरिभाऊ पवार, ग्रामविस्तार अधिकारी, कोंढवे धावडे

कोंढवे धावडे गावच्या एकूण २६२५ एकर क्षेत्रापैकी २४७५ एकर क्षेत्र राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी १९४८ नंतर सरकारी दफ्तरी जमा झाले आहे. ते एकूण जागेच्या ८० टक्के आहे. आता फक्त १५० एकर (२० टक्के) क्षेत्र उरले आहे. सिटी सर्व्हेचा विषय प्रलंबित असून, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. 
- सुधीर धावडे, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com