'निसर्ग' चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत : उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

- 'निसर्ग' बधितांना जास्तीत जास्त मदत देणार

पुणे : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे बाधित नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पुण्यासह राज्यातील सर्व बाधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'निसर्ग' चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी बैठक झाली. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार अशोक पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अतुल बेनके, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनील टिंगरे आणि वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, विजेचे खांब उभे करणे, गरज भासल्यास दुसऱ्या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा, अंगणवाडी दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करणे, नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला निर्देश दिले. राज्य सरकारच्या वतीने बाधितांना मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामगार मंत्री वळसे पाटील म्हणाले, आदिवासी भागातील बाळहिरड्याचे नुकसान झाले आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना वेगळा मापदंड लावून नुकसानभरपाई देण्याचा विचार व्हावा. आदिवासी भागात घरांचेही मोठे नुकसान झाले, त्यासाठी तातडीने मदत व्हावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

'निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा :

नजरअंदाज अहवालानुसार बाधित झालेल्या गावांची संख्या  :  371  
बाधित शेतकरी :  28 हजार 496 
बाधित क्षेत्र : 7 हजार 874 हेक्टर
पॉलीहाऊस, शेडनेटचे नुकसान : सुमारे 100 हेक्टर (87 गावातील 317 पॉलीहाऊस, शेडनेटचे नुकसान).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do Immediate Investigation of Loss due to Nirarg Cyclone says Ajit Pawar