अफवांवर विश्‍वास ठेवू नका - पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पुणे - कागदनिर्मिती रद्दीपासून ३५ टक्के, भाताचा तूस, गव्हाचा तण आणि बगॅस पासून ४२ टक्के होते. केवळ २३ टक्के निर्मिती झाडापासून मिळणाऱ्या लगद्यापासून होते. झाडे तोडली तरीही त्यापेक्षाही कितीतरी पटीने कंपन्यांमार्फत हजारो एकर जागेत शेतकऱ्यांच्या सहकार्यातून कागद निर्मिती होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या कागद व्यवसायासंबंधीच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनने केले आहे. 

हरीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या परिषदेत महात्मा गांधी यांनी कागदाचे महत्त्व विशद केले होते. 

महात्मा गांधी यांनी मूळचे पुण्याचे असलेले शास्त्रज्ञ के. बी. जोशी यांना टाकावू वस्तूंपासून कागद निर्मितीची कला विकसित करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर जोशी यांनी हातकागद उद्योग म्हणजे हॅण्डलूम इन्स्टिट्यूटची निर्मिती केली. त्याचे उद्‌घाटन जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते १ ऑगस्ट १९४० रोजी झाले होते. भारतीय राज्यघटनेची पहिली प्रत या इन्स्टिट्यूटमध्ये बनविलेल्या कागदावर लिहिली गेली. म्हणून १ ऑगस्ट हा दिवस ‘कागद दिवस’ म्हणून फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स ऑर्गनायझेशनतर्फे साजरा करण्यात येणार आहे.  

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. या प्रसंगी सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते असोसिएशनने तयार केलेल्या पर्यावरणपूरक पोस्टरचे अनावरण करण्यात आले. 

या वेळी पवार म्हणाले, ‘‘असोसिएशनच्या योजनांचे निश्‍चित आम्ही स्वागत करू. निर्मिती केलेल्या कागदापासून पुनर्निर्मितीदेखील करता येत असून, हा इको फ्रेंडली व्यवसाय आहे.’’ 

Web Title: Do not believe in rumors pune papers traders association prataprao pawar