Ayodhya Verdict : पुण्यात शांतता; अफवांवर विश्वास ठेवू नका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

Ayodhya Verdict : अयोध्या रामजन्मभुमी व बाबरी मशिद प्रकरणाबाबत अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी सकाळी साडे दहा वाजता निकाल देण्यात आला. दरम्यान, निकाला नंतर कोणत्याही समाजघटकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, त्याद्वारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेषत: संवेदनशील ठिकाणे, प्रमुख रस्ते, प्रमुख चौक, काही संघटनाची कार्यालये या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Ayodhya Verdict : पुणे : अयोध्या येथील राम जन्मभुमी व बाबरी मशिद जमिन मालकीच्या वादाबाबत शनिवारी सर्वोच्य न्यायालयाने निकाल दिला. या पार्श्‍वभुमीवर शनिवारी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप कोणतीही अनुचित घटना घडली नाही. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही, असे पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन शिसवे यानी केले आहे. Image may contain: 4 people, outdoor

अयोध्या रामजन्मभुमी व बाबरी मशिद प्रकरणाबाबत अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी सकाळी साडे दहा वाजता निकाल देण्यात आला. दरम्यान, निकाला नंतर कोणत्याही समाजघटकांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, त्याद्वारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेषत: संवेदनशील ठिकाणे, प्रमुख रस्ते, प्रमुख चौक, काही संघटनाची कार्यालये या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Image may contain: one or more people, people walking and outdoor

याविषयी डॉ.शिसवे म्हणाले, "निकालाच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्य रात्रीपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अद्याप कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही.सोशल मिडियाबाबत दिलेल्या सूचनांचे नागरीकांनी पालन केले आहे. निकालाचे सुन्नी वक्फ बोर्डने स्वागत केले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थचा प्रश्न निर्माण होणार नाही."

वरिष्ठ पोलीस अधिकारी रस्त्यावर
पोलिस सहआयुक्त डॉ. रविन्द्र शिसवे यांच्यासह अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी संवेदनशील ठिकाणावर गस्त घालत होते. 
Image may contain: 2 people, outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not believe the rumors said Pune Police while appealing Citizen