वाहतुकीचे नियम मोडणार नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पुणे - ‘भारताला महान राष्ट्र बनविण्यासाठी, आम्ही यापुढे कधीही वाहतुकीचे नियम मोडणार नाही,’’ अशी शपथ काही वाहनचालकांनी घेतली. रोटरी क्‍लबचे सदस्य आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी ही शपथ दिली.

पुणे - ‘भारताला महान राष्ट्र बनविण्यासाठी, आम्ही यापुढे कधीही वाहतुकीचे नियम मोडणार नाही,’’ अशी शपथ काही वाहनचालकांनी घेतली. रोटरी क्‍लबचे सदस्य आणि ट्रॅफिक वॉर्डन यांनी ही शपथ दिली.

हडपसर येथील मगरपट्टा चौकात ‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी’ यांच्या वतीने गुरुवारी सकाळी वाहतूक अभियान राबविण्यात आले. या चौकात शहर वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी आढळला नाही. येथे वाहतूक अतिशय बेशिस्त आणि निष्काळजीपणे सुरू होती. हडपसरकडून मगरपट्टा सिटीकडे वळणारी वाहने सिग्नलच्या पुढे येऊन पुलाखाली थांबत होती. बीआरटी मार्गातून दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रासपणे जात होती. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच खासगी बसेस, सरकारी वाहने, पीएमपी बस आणि महापालिकेच्या वाहनांचा समावेश होता.

दरम्यान, रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी नियम मोडणाऱ्या काही वाहनचालकांना चौकात बाजूला घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात यापुढे कधीही वाहतुकीचे नियम मोडणार नाही, अशी शपथ दिली.

‘रोटरी क्‍लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी’चे अध्यक्ष चाँद माथूर, प्रियांका मेहता, श्‍वेता शर्मा, डॉ. अनिल मुंगी, हेमंत कुलकर्णी, विवेक पाटील, सूर्यकांत चौधरी, मिलिंद शिंदे, समीर यादव, जी. एस. सलुजा उपस्थित होते.

Web Title: Do not break traffic rules