निधी नको, झाडे द्या उपक्रमातील रोपांचे रोपन

कृष्णकांत कोबल
बुधवार, 27 जून 2018

मांजरी : ग्रामपंचातीने सुरू केलेल्या "निधी नको, झाडे द्या'' या उपक्रमाला चांगला 
प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून पहिल्या टप्यात जमा झालेल्या रोपांचे गावातील 
विविध भागात नुकतेच रोपन करण्यात आले आहे.

मांजरी : ग्रामपंचातीने सुरू केलेल्या "निधी नको, झाडे द्या'' या उपक्रमाला चांगला 
प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमातून पहिल्या टप्यात जमा झालेल्या रोपांचे गावातील 
विविध भागात नुकतेच रोपन करण्यात आले आहे.

घराच्या नोंदीसाठी येणाऱ्या नागरिकांना ग्रामविकास निधीत सूट देवून त्या बदल्यात 
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पाच रोपे देण्याचे आवाहन गेल्या महिन्यात ग्रामपंचायतकडून करण्यात आले होते. या आवाहनाला मिळकतारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतीकडे विविध प्रकारची रोपे जमा होऊ लागली आहेत. पहिल्या टप्यात जमा झालेल्या या रोपांचे स्मशानभूमीसह स्मशानभूमी रस्ता, प्राथमिक शाळा, विविध भागातील गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात रोपन करण्यात आले.

सरपंच शिवराज घुले, उपसरपंच अमित घुले, ग्रामविकास अधिकारी अनील कुंभार, सदस्य समीर घुले, नयना बहिरट, सिमा घुले, सुवर्णा कामठे, निर्मला म्हस्के, सुमीत घुले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

सरपंच शिवराज घुले म्हणाले, "निधी नको, झाडे द्या या ग्रामपंचायतच्या योजनेला 
नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्यापासून सुमारे दोनशेच्यावर रोपे जमा झालेली आहेत. गावातील प्रमूख रस्ते, स्मशानभूमी परिसर, शाळा-महाविद्यालयांचा परिसर, गृहनिर्माण संस्था आदी परिसरात ही रोपे लावण्यात येत आहेत. त्यामुळे हरित मांजरी ग्राम संकल्पना पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे.'' 
 

Web Title: Do not donate funds, donate plant trees