विद्यार्थ्यांला नापास करायचे नाही, यामुळे विद्यार्थ्यांचेच नुकसान - सुप्रिया सुळे

चिंतामणी क्षीरसागर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

वडगाव निंबाळकर - आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास करायचे नाही. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी आपण अभ्यास करायला नको असा घेतला. यामुळे नुकसान होउ लागले आहे. आभ्यासात मागे असनाऱ्या विद्यार्थ्याला चौथी पाचवीतच मागे ठेवले पाहीजे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

वडगाव निंबाळकर - आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांला नापास करायचे नाही. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी आपण अभ्यास करायला नको असा घेतला. यामुळे नुकसान होउ लागले आहे. आभ्यासात मागे असनाऱ्या विद्यार्थ्याला चौथी पाचवीतच मागे ठेवले पाहीजे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे गावभेटीसाठी सुळे आल्या होत्या यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगीतले. आठवी पर्यंतची मुल नापास करायची नाहीत. अशी पद्धत आहे. पुढच्या वर्गात मुल नापास झाल तर त्याचा आभ्यास कव्हर होत नाही. मग नैराष्य येते आणि शाळा सोडली जाते याबाबत संसदेत झालेल्या चर्चेत आम्ही चौथीपासुन परिक्षा घ्यावी मुल नापास करायचे का नाही हे जे त्या राज्यांनी ठरवायचे असे असे सुचवले आहे. संसद ग्राम योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. खासदारांनी गावे दत्तक घेतली पण निधी कुठेय.. आता कामे थंडावली आहेत. 

केंद्रसरकारच्या योजना नावाला छान वाटतात पण परिणाम दिसत नाहीत. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. शेतकरी, कष्टरकरी, सरकारी कर्मचारी नाराज आहेत. हमिभाव नाही. नोकऱ्या नाहीत, आरक्षणाबाबत काही निर्णय नाहीत. सगळा जनतेचा असंतोष वाढतोय आता एकजुटीने उभे राहण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थांनी मांडलेल्या अनेक स्थानिक मुद्यावर सुळे यांनी चर्चा केली. कार्यक्रमासाठी सरपंच शैला भगत, सोमेश्र्वरचे उपाध्यक्ष लालासो माळशिकारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, पंचायत समितीचे गटनेते प्रदिप धापटे, डिजी माळशिकारे, मोहन भगत उपस्थित होते.

असंतोष वाढला असुनही भाजपा का जिंकल
आता तुमच्या मनात असेल की असंतोष वाढलाय मग सांगली, जळगावमधे भाजपा कसे जिंकले... आहो एक जरी निवडणूक हरले असते तरी मुख्यमंत्र्यांना खुर्ची सोडावी लागली असती यामुळे सत्तेच्या जोरावर साम दाम दंड वापरून निवडणुक जिंकली आहे.

Web Title: do not fail student policy, is a loss of students - Supriya Sule