मतदारांनी भूलथापांना बळी पडू नये - राणे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मांजरी - सत्ताधारी सरकारकडून आश्वासनांची खैरात आणि विविध प्रकल्पांसाठी दररोज कोट्यवधींचे आकडे जाहीर केले जात आहेत. मात्र, हे केवळ भूलथापा मारून नागरिकांना गंडविण्याचे काम असून, तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांचा हा डाव आहे. त्याला मतदारांनी बळी न पडता आपली फसवणूक होण्यापासून सावध राहिले पाहिजे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. 

हडपसर कॉंग्रेस समितीच्या वतीने पंधरा नंबर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हडपसर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत तुपे होते. दिलीप शंकर तुपे यांनी संयोजन केले. 

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, नगरसेविका विजया वाडकर, सरचिटणीस चंद्रकांत मगर, दिलीप तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, जयसिंग गोंधळे, शहाजी मगर, अमित घुले, नितीन आरू, गणेश फुलारे, सुनील गायकवाड, चंद्रकांत ससाणे, ऊर्मिला आरू, महेंद्र बनकर, ललिता तुपे आदी या वेळी उपस्थित होते. 

आमदार राणे म्हणाले, ""येणाऱ्या निवडणुकांमध्ये मित्र पक्षाशी आघाडी करावी की न करावी हा वरिष्ठांचा प्रश्न आहे. मात्र, आमच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळत असेल, तरच अशी आघाडी केली जावी, अशी आमची भूमिका आहे. जाती-जातींमध्ये आणि धर्मा-धर्मांमध्ये भेद करण्याचे काम सध्या सत्ताधारी करीत आहेत. युतीच्या दोन्ही पक्षातील नेते आणि मंत्र्यांमध्ये चाड राहिली नाही. ते सामान्य जनतेचा काय विचार करणार.'' 

शिवरकर म्हणाले, ""आम्ही कामे केली; पण ती सांगितली नाहीत. आमच्या सरकारने आणलेल्या माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून सत्ताधारी नुसत्या जाहिराती करीत आहेत. काम तर कुठेच दिसत नाही.''

Web Title: Do not fall prey to deceive voters