नव्या पिढीला साहित्याचा व वाचनाचा विसर पडून देऊ नये - ड़ॉ. अश्विनी धोंगडें

- श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सासवड(पुणे) - खरे साहित्य आपल्याला सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवण्यास मदत करते. वाचनातून माणसाला माणूस जोडला जातो. हे तंत्र असेच टिकवून ठेवण्यासाठी बदलत्या स्थितीतही नव्या पिढीनेही साहित्याचा विसर पडून देऊ नये., असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व अत्रे संमेलनाध्यक्षा डॉ. अश्विनी घोंगडे यांनी येथे केले. 

सासवड(पुणे) - खरे साहित्य आपल्याला सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवण्यास मदत करते. वाचनातून माणसाला माणूस जोडला जातो. हे तंत्र असेच टिकवून ठेवण्यासाठी बदलत्या स्थितीतही नव्या पिढीनेही साहित्याचा विसर पडून देऊ नये., असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व अत्रे संमेलनाध्यक्षा डॉ. अश्विनी घोंगडे यांनी येथे केले. 

सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात डॉ. धोंगडे यांचे हस्ते 21 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले. सासवडच्या आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त हे संमेलन दोन दिवशीय होत आहे. 

त्याचा प्रारंभ आज अत्रेंच्या पुतळ्याच्या पूजनाने व दिपप्रज्वलनाने झाला. यावेळी सोलापूरच्या युवा नेत्या रश्मी बागल - कोलते यांनी स्वागताध्यक्ष म्हणून बंडुकाका जगताप यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, म.सा.प. शाखाध्यक्ष रावसाहेब पवार, सभापती अतुल म्हस्के, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, शालीनी पवार, राजेंद्र ना. जगताप, प्रदिप पोमण, शिवाजी पोमण, सुनिता कोलते, अॅड. प्रकाश खाडे, ख्वाजाभाई बागवान, शांताराम पोमण, अॅड. कला फडतरे, हनुमंत चाचर, वसंत ताकवले आदी उपस्थित होते. 

कऱ्हेच्या पाण्याने व पुरंदरच्या मातीने अत्रेंना मोठे केले. त्यामुळे तर अत्रेंनी चौफेर साहित्य निर्मिती केली. त्यांच्या नावाच्या संमेलनाचे त्यांच्याच जन्मगावात अध्यक्ष होणे.. हा माझा बहुमान वाटतो., असे सांगून डॉ. धोंगडे म्हणाल्या., अत्रे संमेलनाच्या धर्तीवर याहून छोट्या गावांतही ही संमेलने व्हायला पाहिजेत. तरच वाचन संस्कृती पुन्हा आकार घेईल. यानिमित्ताने सभापती अतुल म्हस्के यांनीही विचार मांडले. यावेळी प्रास्ताविक विजय कोलते यांनी व संमेलन आढावा रावसाहेब पवार यांनी सादर केला. स्वागत रश्मी बागल - कोलते यांनी केले. सूत्रसंचालन सचिन घनवट यांनी केले. आभार इंदिरा पवार यांनी मानले. उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रमांची दोन दिवस रेलचेल चालणार आहे. 

कऱ्हेकाठच्या `साहित्यदिंडी`ची मी `वारकरी` झाले..
स्वागताध्यक्षा रश्मी बागल - कोलते म्हणाल्या., मी छोटी आहे.. पण अत्रे संमेलनाचे मला स्वागताध्यक्ष केले, त्यातून मी कऱ्हेकाठच्या साहित्यदिंडीची आज वारकरी झाले. यापुढेही अत्रे संमेलनास हातभार लावून ही साहित्याची पतका उंच फडकविण्यास अग्रभागी राहील.

Web Title: Do not forget the literature and reading - Dr. Ashwini Dhongade