भाऊबीजेच्या उपक्रमाचे राजकारण नको - मिसाळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दिवाळीत बहिणीला भावाने भेटवस्तू देण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे. सामाजिक बांधिलकीतून पुणे शहरात भाऊबीजेचे असे कार्यक्रम विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून गेली अनेक वर्षे सुरू आहेत.

पुणे- आर्थिक मागास बहिणींना भाऊबीज म्हणून साड्या वाटप करण्याचा उपक्रम सामाजिक असून, सवंग प्रसिद्धीसाठी या उपक्रमाचे काही पक्षांनी राजकारण करू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष आणि आमदार माधुरी मिसाळ यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. 

कोथरूड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाऊबीज म्हणून वस्ती भागातील महिलांना साड्या वाटप करण्याचा उपक्रम सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीने त्याला विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दिवाळीत बहिणीला भावाने भेटवस्तू देण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे. सामाजिक बांधिलकीतून पुणे शहरात भाऊबीजेचे असे कार्यक्रम विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमांतून गेली अनेक वर्षे सुरू आहेत. चंद्रकांत पाटील यांनी हा उपक्रम लोकसहभागातून करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, कोणतीही माहिती न घेता, काही राजकीय पक्ष सवंग प्रसिद्धीसाठी या उपक्रमाला विरोध करीत आहेत आणि पुणेकरांमध्ये गैरसमज पसरवीत आहेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not politicize the program bhaubij says Madhuri Misal