रिंगरोडमधील बदलाचे नकाशेच मिळेनात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडमध्ये बदल करून राज्य सरकारने त्यास मान्यता दिली; परंतु हे बदल करण्यात आलेल्या ठिकाणांचे नकाशे प्रसिद्ध करण्यास नगर विकास खात्याकडून चालढकल सुरू आहे. कारण नकाशेच मिळत नाहीत, त्यामुळे हरकती-सूचना मागवायच्या कशा, असा प्रश्‍न नगररचना विभागाला पडला आहे. हे नकाशे अंतिम होत नाहीत, तोपर्यंत पुढील प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे या मार्गाचे डीपीआर तयार करण्याचे काम पूर्णत्वास जाऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

प्रादेशिक आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला असून, त्याला राज्य सरकारनेही मान्यता दिली; मात्र ही मान्यता देताना सरकारकडून धायरी सर्व्हे क्र. १२५, भूगाव येथील सर्व्हे क्र. ३३९ व ३४०, मारुंजी येथील सर्व्हे क्र. ५७ आणि ६२, तसेच वडकी येथील गट क्र. ११०२ या ठिकाणी वळण रस्त्याच्या मार्गात बदल करण्यात आला. त्यावर हरकती-सूचना मागविण्याचे आदेशही नगररचना विभागाला दिले. त्याला आता एक महिन्यांचा कालावधी झाला आहे.

राज्य सरकारकडून ज्या ठिकाणी रिंगरोडमध्ये बदल करण्यात आला आहे, त्याचे नकाशे तयार करून नगर विकास विभागाने ते नकाशे हरकती-सूचना दाखल करण्यासाठी नगररचना विभागाकडे पाठविणे आवश्‍यक आहे; मात्र हे नकाशे अद्याप नगररचना विभागालाच प्राप्त झालेले नाहीत.

रिंगरोडच्या मार्गात बदल करून त्यास मान्यता दिल्याचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत त्यावर हरकती-सूचना मागविणे अपेक्षित होते.

Web Title: do not receive ringroad changes map